*कोरोना टेस्ट समज गैरसमज*

-*डॉ भुषण सेंबेकर प्रबंधक कोवीड़19 सावनेर*
सावनेर– *शासनाने कोरोना विषाणूंच्या संपर्कात आलेल्यांची ओळख पटवून घेण्यासाठी व त्या रुग्णावर तात्काळ उपचारासाठी चार प्रकारच्या टेस्टींग चा अवलंब केला असुन तो संपूर्ण भारतात सुरु असुन त्याचे परिणाम ही चांगले येत असल्याचे मत कोवीड़19 चे प्रबंधक चिकित्सक डॉ. भुषण सेंबेकर यांनी आमच्या स्थानिक प्रतिनिधीशी बोलताना मांडले आहे*

*सध्या आपल्याला ऐकण्यात येते, टेस्ट एका लॅब मध्ये पोसिटीव्ह आली आणि दुसरीकडे नेगेटिव्ह..! कोरोना टेस्ट नेगेटिव्ह असूनही डॉक्टर रुग्णाला कोरोना झाला असे म्हणत आहेत..! हा भ्रम कशामुळे?? त्यासाठी खालील गोष्टी समजून घ्या.*
*कोरोना विषाणूंची लागन झाली अथवा नाही याकरीता मुख्यतः खालील या टेस्ट केल्या जातात*

*1. RT PCR swab*
*2. TruNat/CB NAAT swab*
*3. Antigen test*
*4. Antibody test (Ig M आणि Ig G)*
*प्रथम तीन टेस्ट सध्या कोरोना असलेल्या व्यक्तीमध्ये पोसिटीव्ह येत असतात. Ig M Antibody test antibody टेस्ट सध्या आजार असलेल्या आणि ठीक होत असलेल्या मध्ये पाँजेटिव्ह येत असते. Ig G antibody ही टेस्ट आजार ठीक होऊन गेलेल्या लोकांमध्ये पोसिटीव्ह येत असते.*
*ह्या सर्व टेस्ट मध्ये ही काही कमतरता असतात. ह्या कोरोनाचे लक्षण असूनही सर्वच्या सर्व कोरोना रुग्णांमध्ये पोसिटीव्ह येत नसतात. रुग्णाला कोरोनाची लक्षणे असूनही टेस्ट नेगेटिव्ह असू शकते. असे का होते? बऱ्याच गोष्टीवर टेस्ट result अवलंबून असतात.*
*१. वेळ: आपण टेस्ट लक्षणांच्या सुरुवातीच्या 2-3 दिवसात किंवा खूप उशिरा जसे की 12-14 दिवसानंतर केली तर कोरोना आजार असूनही टेस्ट negative येऊ शकते.*
*२. टेस्ट चा प्रकार: RT PCR ही टेस्ट 10 कोरोना रुग्णामध्ये 7 मध्येच पोसिटीव्ह येत असते.*
*Antigen टेस्ट ही फक्त 50% कोरोना रुग्णामध्ये पोसिटीव्ह येत असते.*
*३. Swab घेण्याची जागा:*
*घश्यापेक्षा नाकातून swab घेतला तर स्वब पोसिटीव्ह येण्याचे जास्त चान्स असतात.*
*४. Technical प्रॉब्लेम: अशा बऱ्याच छोट्या छोट्या बाबी असतात.*
*Swab नेगेटिव्ह आल्यास मग निदान कसे होणार?*
*1. छाती चा CT स्कॅन वर बऱ्याच रुग्णामध्ये निदान करता येते (आजाराची लक्षणे नसलेल्या रुग्णामध्ये सुद्धा). पण ही तपासणी तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावी.*
*2. रुग्णाची पूर्ण history, कोरोनाची लक्षणे आणि शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण (पल्स ऑक्सिमीटर च्या साहायाने) तपासून डॉक्टर कोरोनाचे अचूक निदान करू शकतात.*
*अश्या प्रकारे निदान करून (swab negative असताना सुद्धा) कोरोना चा इलाज आवश्यक असतो. Swab negative समजून, डॉक्टरांवर विश्वास न ठेवता इलाज नाही करणे रुग्णाला नुकसानदायक ठरू शकते. अशा रुग्णापासून आजार दुसर्यांना पसरू शकतो. त्यासाठी टीव्ही व इतर प्रसार माध्यमाच्या भ्रामक न्युज सोशल मीडियावर पसरवीणार्यांपासून दूर राहा. डॉक्टरांच्या सल्यानुसार उपचार करा. हा आजार बऱ्याच रुग्णामध्ये लक्षण विरहित असतो, पण मधुमेही वृद्ध इत्यादी अशा लोकांना धोकादायक ठरतो.*
*कोवीड़ 19 विषाणूंचा नायनाट करण्याकरिता शासनाच्या दिशानिर्देशाचे काटेकोर पाणे पालन करुण समस्त आरोग्य अधिकारी परिश्रम घेत आहेत कुणालाही चुकून अथवा जाणूनबुजून पाँजेटिव्ह करण्याचा आरोग्य विभागास काय लाभ.याउलट जर एखादा रुग्ण पाँजेटिव्ह आढळताच आरोग्य विभागासह स्थानिक प्रशासकीय यंत्रणेला सर्व उपाययोजना युध्दस्तरावर कराव्या लागतात. व पुढील 28 दिवस रुग्ण मीळालेल्या परिसरात शासकीय कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर लाववे लागते.*
*संपूर्ण देशासह आपल्या क्षेत्रातही कोरोना पाँजेटिव्ह असलेल्या रुग्णांची बरे होण्याची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे करिता घाबरण्याचे कोणतेही कारण नाही आपण नागरिकांनी आरोग्य विभागास सहकार्य करावे व कोणत्याही अफवांना बळी पडू नये तसेच सर्दी,पडसे,खोकला, ताप सारखे लक्षणे आढळताच नजिकच्या प्राथमिक आरोग्य केन्द्र अथवा कोवीड़ सेंटर वर पोहचून आपले टेस्टींग करून घ्यावेत अशी विनंती आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली*

*तर सोबतच कोवीड़19 सहयोगी प्रबंधक डॉ संदीप गुजर यांनी आपले विचार व्यक्त करित म्हटले की संपूर्ण प्रशासन नागरिकांच्या आरोग्याकरीता अहोरात्र झटत आहे.संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कोवीड़19 या विषाणूंच्या वाढत्या प्रभावातही आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी न करता कोरोना वायरस शी दोन दोन हात करत आहे.नागरिकांनी सहकार्य करावे व त्याकरीता डॉक्टरांवर विश्वास ठेवून कोरोनाच्या आजारावर विजय मिळवन्यास सहकार्य करावे असे निवेदन प्रसार माध्यमातून नागरिकांना केले आहे.*
Maharashtra News Media सच की आवाज