*आमदार दादाराव केचे यांनी केलेल्या आवाहनानुसार आर्वी विधानसभा क्षेत्रात आंदोलन*
*प्रतिनिधी पंकज रोकडे*
वर्धा- भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दुध उत्पादकांच्या हक्काच्या आणि देय मागण्यांसंदर्भात १ अॉगष्टला राज्यव्यापी आंदोलन उभे करण्यासंदर्भात दिलेल्या सुचनेनुसार आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दुध उत्पादकांच्या प्रश्नांना, शेतकरी कर्जमाफी, अवास्तव आलेली विद्युत देयके याबाबत वाचा फोडण्याचे आवाहन केले होते. आमदार दादाराव केचे यांनी केलेल्या आवाहनाला दुध उत्पादक आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उदंड प्रतिसाद देत शहरी व ग्रामीण भागात गोरगरीब नागरिकांनी दुधाचे वाटप करून अहिंसात्मक आंदोलने केली. आमदार दादाराव केचे यांनी उपविभागीय अधिकारी यांना मागणी संदर्भात निवेदन दिले.
महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या संकट काळात राज्यभरातील जनतेकडे दुर्लक्ष केले आहे. त्यातच राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आहे. राज्यात भाजपाचे सरकार असताना दुधाला सरसकट प्रती लिटर ५ रुपये अनुदान व दूध भुकटी निर्यातीस सुद्धा अनुदान दिले जात होते. आता तर दुधाचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. मात्र राज्यातील नाकर्ते सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणतीही उपाय योजना राबवली नसून त्यांना वाऱ्यावर सोडले आहे.
दुधाला प्रति लिटर ३० रूपये भाव व १० रूपये प्रति लिटर अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे. अतिरिक्त दुधापासून निर्माण होणाऱ्या दूध पावडरला ५० रुपये अनुदान मिळावे. प्रत्येक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देऊन तातडीने नव्याने कर्ज पुरवठा करावा. लॉकडाऊन दरम्यान ग्राहकांना महावितरणने अवास्तव पाढवलेली विद्युत देयके पुर्णपणे माफ करावी या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली.
आंदोलना दरम्यान गोरगरीब जनतेला दुध वाटप तसेच रूग्णालयात भरती असलेल्या रूग्णांना दुधाचे वाटप करण्यात आले. आंदोलनात महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ घोषना देण्यात आल्या. आंदोलनात आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यातील शहरी व ग्रामीण आर्वी, आष्टी, कारंजा, नांदपूर, रोहना, विरूळ, वाढोणा, खरांगणा, तळेगाव (शा), साहुर, पिंपळा पुनर्वसन इत्यादी ठिकाणी भाजप व भाजयुमोच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सक्रीय सहभाग नोंदविला.
Maharashtra News Media सच की आवाज