Breaking News

*सावनेर कोरोना ब्रेकिंग* *सावनेर तालुक्यात एकूण 8 कोरोना पॉजिटिव रूग्ण आढळले* *तालुक्यात सावनेर शहर दोन, वेकोली खदान तीन, पाटनसावंगी खदान दोन , खापरखेडा एक*

*सावनेर कोरोना ब्रेकिंग*

 

*सावनेर तालुक्यात एकूण 8 कोरोना पॉजिटिव रूग्ण आढळले*

*तालुक्यात सावनेर शहर दोन, वेकोली खदान तीन, पाटनसावंगी खदान दोन , खापरखेडा एक*

मुख्य संपादक किशोर ढूंढेले

*आज सावनेर येथील शासकीय औधोगीक प्रशिक्षण केन्द्रात असलेल्या कोवीड़ 19 सेंटर येथे कोरोना विषाणूंच्या ग्रस्तांच्या संपर्कात अथवा संसर्गात आलेल्या तसेच इतर संशयास्पद 65 नागरिकांच्या अँन्टीजेन तर 26 नागरिकांच्या आरटीपीसीआर या टेस्ट करण्यात आल्या त्यात सावनेर शहरातील दोन व वेकोली परीसरातील दोन असे चार रुग्ण अँन्टीजेन पाँजेटिव्ह आढळले असुन सोबतच तीन चार दिवसाआधी दादाजी नगर सावनेर येथील रहवासी यांच्यावर मेडिकल हाँस्पिटल येथे कीरकोळ शस्रक्रिये आधि केलेल्या कोवीड़19 तपासणी चा अहवाल आज प्राप्त झाल्याने तो पाँजेटिव्ह आढळला तो सावनेर वेकोली येथे कार्यरत असल्याची माहीती असुन सावनेर दोन व वेकोली तीन असे पाच रुग्ण आज तपासणीतून आढळले आहे*

*सावनेर येथे आढळलेल्या रुग्णात तहसील कार्यालयातील एक महिला नायब तहसीलदार तर दुसरा गुजरखेडी येथील 24 वर्षीय युवक असल्याची माहीती सावनेर कोवीड़ 19 चे प्रबंधक डॉ. भुषण सेंबेकर, डॉ.संदीप गुजर,नगर परिषद सावनेर चे मुख्याधिकारी रविंद्र भेलावे व कोवीड़19 चे व्यवस्थापक अतुल गावंडे यांनी दीली तर तालुक्यातील पाटनसावंगी दोन व खापरखेडा एक असे एकुण आठ रुग्ण आढळले*

*दिवसेंदिवस शहरात कोरोना विषाणूंची लागन झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी शहरातील रस्त्यावरील गर्दी कमी होत नसून स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतर ही दोन दोन तीन तीन तास व्यवसायीक प्रतिष्ठाने उघडी ठेऊण नगर प्रशासनाचे वाहन दिसताच ग्राहकांची गर्दी दुकानात ठेवत शटर बंद चा खेळ तर सोबतच फळभाज्या विकनारे शहरातील मुख्य रस्त्यावर ठाण मांडून बसत कोरोना विषाणूंच्या आगमणाची वाट बघत बसले असल्याचे चित्र आहे.*

*सावनेर तालुक्यातील पाटनसावंगी, केळवद,खापा, बडेगाव,खापरखेडा, चनकापुर येथील कोवीड़19 तपासणी चा अहवाल प्राप्त झाला असून पाटनसावंगी खदान परिसर दोन व खापरखेडा परीसरात एक असे एकुण आठ रुग्ण मीळाले आहे.आपल्या सर्वांच्या विश्वासाचे विश्वसनीय महाराष्ट्र न्यूज मीडिया व्दारे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की शासनाने दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करा गर्दीचे ठिकाण टाळा,अतीआवश्यक असल्यासच घराबाहेर निघा,सुरक्षीत अंतर व मास्क चा वापर करा*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …