*पुंड परिवाराचा गुंडाराज..* *पुण्यश्लोक विद्यानिकेतन खुमारी येथील प्रकार..*

*पुंड परिवाराचा गुंडाराज..*


*पुण्यश्लोक विद्यानिकेतन खुमारी येथील प्रकार..*

मनसर प्रतिनिधि- पंकज चौधरी

मनसरदि.7/8/2020 ला सकाळी 10.20 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी शिक्षण संस्था, मनसर यांच्या अंतर्गत येणाऱ्या पुण्यश्लोक विद्यानिकेतन खुमारी या शाळेतील सहाय्यक शिक्षक श्री.गुणवंता तामखाने,संस्थेचे सचिव श्रीमती.रजनी मनोहर साव(डांगे),ग्रा.पं. खुमारी येथील सरपंच सौ.सुनीताताई इनवाते,पं.समिती सदस्या काठोते मॅडम,खुमारी पोलीस पाटील श्री.कन्हैया भरडे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यासह शाळेत गेले असता आपल्या प्रशासकीय अधिकारातून दि.11/06/2020 ला श्री. वासुदेव भोलानाथ पुंड यांनी शाळेच्या मुख्य गेट ला तसेच मुख्याध्यापक कक्षाला कुणाचीही परवानगी न घेता ताळे लावले.

हेच ताळे श्री.गुणवंता तामखाने यांनी आपल्या प्रशासकीय अधिकारातून तोडले.याचवेळी खुमारी येथील वासुदेव भोलानाथ पुंड,अशोक भोलनाथ पुंड,गजानन पुंड,सचिन पुंड,प्रविण पुंड,अभिषेक पुंड,गोलू अशोक पुंड,अचानक शाळेत काठ्या घेऊन शिविगाळ करीत दाखल झाले व भांडण करू लागले,व प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पोलीस पाटील खुमारी यांनी मनसर चौकी येथील पोलीसांना पाचारण केल्यामुळे व त्यांच्या उपस्थितीमुळे मोठा अनर्थ टळला. आजच्या घटनेत संचालिका व कर्मचारी यांना जिवे मारण्याचा कट अशोक पुंड,वासुदेव पुंड,गजानन पुंड यांनी रचला होता.

या प्रकरणात शिक्षणाधिकारी (माध्य)श्री, पटवे हे पूर्णपणे शामिल असून ज्यांचा ता संस्थेशी काहीही संबंध नसून देखील श्री.वासुदेव पुंड याला सहकार्य करित आहेत. आज जवळ-जवळ दोन महिन्यांपासून शाळा बंद आहे,याला सर्वश्री जबाबदार शिक्षणाधिकारी (माध्य)श्री.पटवे हेच जबाबदार आहेत.जर शिक्षणाधिकारी पटवे यांनी शाळा उघडण्याची परवानगी तात्काळ दिली नाही तर संपूर्ण कर्मचारी आत्मदहन करतील,कारण श्री.अशोक पुंड,वासुदेव पुंड,गजानन पुंड व पुंड परिवाराच्या दहशतीमुळे कर्मचारी शाळेत जाण्यास असमर्थ आहेत..

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …