*कंटेन्मेंट झोन मधे नागरिकांची गैरसोय टाळा*- मनोहर कुंभारे

*सावनेर प्रतिनिधी दीनेश चौरसीया*
*नागपूर ः शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्गजन्य प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे ठिकठिकाणी कंटेन्मेंट झोन उभारण्यात आले आहे परंतु तेथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबतच्या तक्रारी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष व आरोग्य सभापती मनोहर कुंभारे यांना प्राप्त होत आहेत.त्या अनुशंगाने त्यांनी प्राथमिक आरोग्य केन्द्र (पीएससी)चा दौरा करुण कंटेन्मेंट झोन मधिल नागरिकांची होणारी गैरसोय तातडीने टाळण्यासाठी उपाययोजना आखन्याच्या सुचना आरोग्य प्रशासनास केल्या आहेत.*

मनोहर कुंभारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिपक सेलोकर यांचे सोबत सावनेर तालुक्यातील पाटनसावंगी, धापेवाडा, केळवद या प्राथमिक आरोग्य केन्द्राला भेटी देत कोरोना विषाणूग्रस्त रुग्ण व उपाययोजना आदिंचा आढावा घेतला.यावेळी कुंभारे यांनी प्रशासनास सांगितले की सद्यापरिस्थीत शेती हंगाम सुरु आहे.मात्र रुग्ण संख्या ही वाढत असताना प्रशासनाने उपाययोजना आखताना शेतकऱ्यांना त्रास होणार व त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.शिवाय कंटेन्मेंट झोन मधिल नागरिकांना नियमित पाणी पुरवठा, त्यांच्या पर्यंत इतर जिवनावश्यक वस्तू पोहचविण्याची व्यवस्था करावी. याशिवाय दुध व किराणा त्यांना कसा उपलब्ध होईल याचे योग्य नियोजनाच्या सुचना त्यांनी याप्रसंगी केल्या*
*पीएससी मधे असलेला औषधसाठा रुग्ण व वीलगिकरणात असलेल्या नागरिकांची माहिती जाणून घेत वाढती कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी युध्दस्तरावर उपाययोजना करण्याच्या सुचना यावेळी जील्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी जिल्हा प्रशासनास दील्या*
Maharashtra News Media सच की आवाज