*वर्धा कारागृहात कैदी ने केली आत्महत्या*
प्रतिनिधी- पंकज रोकडे
*खून प्रकरणात मिळाली होती शिक्षा*
*घटनेमुळे हादरले जेल व्यवस्थापन*
*न्यायालयीन चौकशीचे आदेश*
वर्धा- खून प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या कैदयाने गुरूवारच्या पहाटे बॅरेकमध्ये गळफास लाऊन आत्महत्या केली. या घटनमुळे जेल व्यवस्थापन हादरले आहे. घडलेल्या प्रकाराची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मृतकाचे नाव गोपीचंद रामचंद्र डहाके (३८) असे आहे. तो यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहे.
माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील गोपीचंदविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणात त्याला शिक्षा ठोठावण्यात आली होती. अमरावती कारागृहात काही महिने त्याला ठेवण्यात आल्यानंतर वर्धा येथील कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली होती. काही महिन्यांपुर्वी गोपीचंद पेरोल सुटला होता. मात्र कालावधी झाल्यावर देखील तो कारागृहात परतला नव्हता. त्यामुळे अमरावती, यवतमाळ, वर्धा पोलिस त्याच्या मागावर होते. यवतमाळ जिल्ह्याचा रहिवासी असल्याने स्थानिक पोलिसांनी त्याच्या गावावर लक्ष केंद्रीत केले होते. गोपीचंद मुळ गावी आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. चौकशीनंतर त्याची वर्धा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. मागील काही दिवसांपासून गोपीचंद चिेंतेत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान गुरूवारच्या पहाटे त्याने दुपट्टा खिडकीला बांधून गळफास घेतला. कारागृह अधिका-यांनी दिलेल्या माहितीवरून शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूर येथे पाठविला.