Breaking News

*घराचा कोंडा तोडून 50 हजाराचा ऐवज लंपास* *श्वान पथक व ठसेतज्ञ घटनास्थळी डेरा दाखल*

*घराचा कोंडा तोडून 50 हजाराचा ऐवज लंपास*

*श्वान पथक व ठसेतज्ञ घटनास्थळी डेरा दाखल*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*


*सावनेरः शहरातील सुरक्षित व दाट वस्त्यांमध्ये आता चोरटे लक्ष करु लागल्याने नागरिकांनमधे आपल्या मालमत्तेच्या सुरक्षितते विषयी भीतीचे वातावरण निर्माण होत आहे*


*असाच प्रकार दि.9 आँगस्ट रोजी सकाळी उघडकीस येऊण चोरट्यांनी फीर्यीदीच्या घरातून कपाटात ठेवलेले सोन्यांचांदीचे दगीन्यासह नगद रोकड़ असे एकुण पन्नास हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली*


*फीर्यादी मनिष प्रकाश शुक्ला रा.महाजन लेआऊट यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार रक्षाबंधनाच्या निमित्ताने ते व त्यांची पत्नी दोघेही आदल्या दिवशी सासरी गेले असता रात्र व रात्रीच्या पावसामुळे त्यांना सासरी मुक्कामी रहावे लागले तर त्यांची आई व मुलगा घरीच मुक्कामाला होत्या व आजी व नातु यांनी वरच्या मजल्यावर कुलुप लावून खालच्या तळ्यावर झोपीला गेले.*

*रात्रीचा पाऊस व काळोखाच्या आंधाराचा फायदा चोरट्यांनी उचलच आवाराच्या भींतीवरुण घरात प्रवेश केला असावा असा अंदाज व्यक्त केल्या जात असुन चोरट्यांनी वरच्या मजल्यावर पोहचून दाराचे कुंडी कुलूप तोडून घरात प्रवेश करत गोदरेजच्या कपाटात असलेले सोने चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम असे एकुण पन्नास हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.*


*सदर घटनेची माहिती सावनेर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनास्थळावरील परिस्थिती बघून जिल्हा स्थळावरुण श्वान पथक व ठसेतज्ञांना पाचारन करण्यात आले परंतू रात्रीच्या पावसामुळे श्वान पथक विशेष काही करु शकले नसल्याची माहिती उघडकीस येत असली तरी ठसे तज्ञांनी घेतलेल्या पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध लावल्या जाणार की हवेत हातपाय मारत मागील अनेक चोरी घरफोडीच्या घटनाप्रमाणेच सदर चोरीची घटना तपास दप्तराचे ओझे वाढविणार नाही ना…?*

*घटनेची सावनेर पोलीस स्टेशन दप्तरी नोंद करुण भादवी कलम 457/380 अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सागर कारंडे चोरट्यांचा कसुन तपास करत आहे*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …