*नक्षल्यांच्या हल्ल्यात एक पोलिस जवान शहीद, दुसरा जखमी*
गड़चिरोली प्रतिनिधि-सूरज कुकुडकर
गडचिरोली: किराणा दुकानात सामान खरेदी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर नक्षल्यांनी गोळ्या झाडल्या. यात दुष्यंत नंदेश्वर(२६) नामक पोलिस जवान शहीद झाला असून, दिनेश भोसले हा जवान जखमी झाला आहे. ही घटना काल सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास भामरागड तालुक्यातील कोठी येथे घडली.
*स्वातंत्र्य दीनाच्या पार्श्वभूमी वर भ्याड हल्ला*
मौजा कोठी येथे पोलिस मदत केंद्र असून, त्यात दोन्ही जवान कार्यरत होते. ते काल दिनांक 14 ऑगस्ट ला सकाळी किराणा सामान आणण्यासाठी दुकानात गेले असता दबा धरुन बसलेल्या साध्या वेशभूषेतील दोन ते तीन नक्षल्यांनी दुष्यंत नंदेश्वर व दिनेश भोसले यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात दुष्यंत शहीद झाला, तर दिनेश जखमी झाला. हे कृत्य नक्षल्यांच्या रॅपिड अॅक्शन टीमने केल्याचा अंदाज आहे. जखमी दिनेश भोसले यास नागपूरला हलविण्यात आले आहे. शहीद दुष्यंत नंदेश्वर याचे पार्थिव आणण्यासाठी गडचिरोलीहून हेलिकॉप्टर पाठविण्यात आला. परंतु पावसामुळे हेलिकॉप्टर घटनास्थळी पोहचू शकला नाही. त्यामुळे पोलिसांच्या वाहनाने पार्थिव गडचिरोलीत आणण्यात येत असून, रात्री उशिरा मानवंदना देऊन दुष्यंतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती पोलिस विभागातर्फे देण्यात आली.
दु्ष्यंत नंदेश्वर हा गडचिरोली येथील रहिवासी होता. शहरातील गोकुळनगर परिसरातील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयासमोरील भागात तो कुटुंबीयांसह वास्तव्य करीत होता. तो अविवाहित होता. त्याचे वडील पंढरी नंदेश्वर हे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांचे वाहनचालक होते.
या भ्याड़ हल्लयाचा सर्वत्र निषेध होत असुन मित्र परिवारात शोक व्यक्त केला जात आहे.
Maharashtra News Media सच की आवाज