Breaking News

*राज राजेश्वरी आश्रम परसोडी व्दारे निर्मिती केळवद पोलीस स्टेशन परिसरातील बगीचाच्याचे पोलीस अधिक्षकांच्या हस्ते लोकार्पण* *धर्मगुरू राजकुमार बसवार (गुरुजी) व ठानेदार मट्टामी यांच्या प्रयत्नाचे फलीत*

*राज राजेश्वरी आश्रम परसोडी व्दारे निर्मिती केळवद पोलीस स्टेशन परिसरातील बगीचाच्याचे पोलीस अधिक्षकांच्या हस्ते लोकार्पण*

*धर्मगुरू राजकुमार बसवार (गुरुजी) व ठानेदार मट्टामी यांच्या प्रयत्नाचे फलीत*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत दिनेश चौरसीया*

*सावनेरः क्षेत्रातील ख्यातनाम आद्यात्मीक धर्मगुरू राजकुमार बसवार व गुरुमाता यांच्या आध्यात्मिक समाज कार्याची प्रचीती सदुर असुन तालुक्यातील केळवद पोलीस स्टेशन हद्दीतील परसोडी येथे राज-राजेश्वरी आश्रमाची स्थापना करुण क्षेत्रातील धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा जपणारे गुरुवर्य राजकुमार बसवार उपाख्य (गुरुजी) व त्यांच्या अर्धांगिनी गुरुमाता दिप्तीताई यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पोलीस बांधव व त्यांच्या परिवाराकरिता केळवद पोलीस स्टेशन परिसरातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील मोकळ्या जागेवर सुंदर असा बाग-बगीचाच्याची संकल्पना उदयास येताच त्यांनी केळवद पोलीस स्टेशन चे ठाणेदार मट्टामी यांच्याशी संपर्क करूण स्वःखर्चाने बगीचाच्याचे निर्मिती करण्याचा मानस व्यक्त करताच ठाणेदार मट्टामी यांनी वरिष्ठांशी बोलनी करुण बाग निर्माण करण्याची परवानगी दीली व बघता बघता बाग निर्माण झाले*

*कोरोना मुळे लोकार्पण सोहळा लांबला*

*गुरुजी व गुरुमाऊली च्या संकल्पनेतील बाग पुर्णत्वास येण्यापूर्वीच संपूर्ण विश्वावर कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाला व बगीच्याचे लोकार्पण सोहळा लांबनीवर गेला अश्यातच 15 आँगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर मा पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण राकेश ओला यांच्या हस्ते व मा.अशोक सरंबळकर उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर,घर्मगुरु राजकुमार बसवार (गुरुजी),गुरुमाऊली दिप्तीताई,समाजसेवी डोमासाव सावजी तसेच अनेक मान्यवरांच्या आदिंच्या प्रमुख उपस्थितीत सदर बगीचाच्याचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला*


*याप्रसंगी आपले विचार व्यक्त करत पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी म्हटले की राजकुमार बसवार यांची संकल्पना ही खरचं समाजाला एक दिशा देणारी आहे.कारण आपण बघतो की समाजात पोलीस विभागात काम करतांना पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना कीती तान असतो सतत सतत च्या कामामुळे ते आपल्या परीवारासोबतच वेळ घालवून शकत नाही,त्यांना कुठे बाहेर फीरायलां नेऊ शकत नाही अश्यात पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या वसाहतीतील हा बाग पोलीस अधिकारी कर्मचारी व त्यांच्या परिवारातील सदस्यांचा मानसिक तान कमी करण्यासाठी उपयोगी ठरेल असे मत व्यक्त केले.

तर धर्मगुरू राजकुमार बसवार यांनी आपले विचार व्यक्त करत म्हटले की पोलीस खात्यातील मानसिक त्रास सोबतच मुलाबाळांकरिता वेळ न देऊ शकने त्यामुळे परिवारावर ही याचा विपरीत परिणाम पडतो धर्म,आध्यात्म व संस्कृतीच्या माध्यमातून तर राज-राजेश्वरी आश्रम समाजसेवा करतच आहे यासोबतच असे छोटे मोठे कार्य करुण आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचे हे आमचे छोटासे प्रयत्न असल्याचे बोलून दाखवीले.

 

याप्रसंगी अँड् शैलेश जैन,निशिकांत देशमुख, रामकुमार बसवार तसेच केळवद पोलीस स्टेशन चे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी व त्यांचा परिवार प्रमुखांने उपस्थित होते या लोकार्पण सोहळ्याची सांगता मा.पोलीस अधिक्षक राकेश ओला व उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सरंबळकर यांचे हस्ते वुक्षारोपन करुण करण्यात आली हे विशेष*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …