*राज्य आरोग्य मंत्री राजेन्द्र अड्रावकर याना शिवसेना कडून ट्रामा केअर सुरु करण्याचे निवेदन*

वरोरा प्रतिनिधि- जुबेर शेख
वरोरा – दिनांक १५/८/२०२० रोजी राज्याचे आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र अड्रावकर हे आज गडचिरोली येथील ध्वजारोहण कार्यक्रमाला आले असता त्यांनी आज शनिवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच च्या सुमारास वरोरा येथील शिवसेना कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी राज्यमंत्र्यांचे स्वागत केले .आणि काही समस्यांचे निवेदन त्यांना सादर केली. यात प्रामुख्याने वरोरा येथील ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यासंबंधीच्या मागणीचे निवेदन होते.ही निवेदने स्वीकारून राज्यमंत्र्यांनी नितीन मत्ते यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मुकेश जीवतोडे, शहर प्रमुख संदीप मेश्राम, नगरसेवक दिनेश यादव ,नगरसेविका सुषमा भोयर ,नगरसेविका प्रणाली मेश्राम, दिपाली माटे, भूषण बुरेले युवासेना तालुक़ा प्रमुख , गणेश जानवे ,जितेंद्र आसेकर ,किशोर भोयर ,,शुभम टोरे,भद्रावती चे नंदू पडाल ,माजरी येथील रवी भोगे, सरताज सिद्दिकी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज