*सावनेर मध्ये श्रवण महिन्यात होतो पुरातन शिव मंदिरातील शिवलिंगाचा श्रुंगार*

*यमराज्याची पत्नी नलिनी व्दारे स्थापित शिवलिंगाचे दर्शन केल्याने भाविकांच्या सर्व मनोकामना पुर्ण होतात*

सावनेर प्रतिनिधि-दिनेश चौरसिया व सूरज सेलकर
*सावनेरः सावनेर शहराचे पौराणिक नाव हे सारस्वत नगरी असून नगरिच्या मधोमध वाहनार्या कोलार नदिच्या तीरावर तत्कालीन राजा वीरवर्माच्यी शिवभक्त मुलगी मिलीनी द्वारे स्वहस्ताने निर्मीत वाळूचे शिवलिंग असुन श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची एकच गर्दी असते.श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारला तर येथील मंदिरात भाविकांची लक्षणीय गर्दी उसळून यात्रेचे स्वरूप प्राप्त होते*
*दरवर्षी श्रावण महिण्यात मंदिरातील शिवलिंगाचे रंगबेरंगी फुलांनी श्रुंगार केला जातो शिवलिंगासोबतच संपूर्ण गाभाऱ्याला फुलमालांनी सुंदर रितीने सजवलेल्या जाते व हि सजावट बघण्याकरिता भाविकांची जणुकाही रिघ लागते*
*पुरातन हेमाडपंथी शिल्पकारीचे भव्य अश्या शिवमंदिरात कोरोना विषाणूंच्या वाढत्या संसर्गामुळे जरी भाविकांची गर्दी कमी असली तरी मंदिर व्यवस्थापनाव्दारे शासनाव्दारे निर्गमीत कोवीड 19 चे सर्व दिशानिर्देशाचे काटेकोर पणे पालन करुण सुरु असलेल्या श्रावण महिण्यात शिवलिंगाचे श्रुंगार परंपरा सातत्याने सुरु ठेवत सदर श्रावण महिना भाविकांच्या अनुपस्थितीत परंतु उत्साहात साजरा केल्या जात आहे*

Maharashtra News Media सच की आवाज