Breaking News

*अनैतिक संबंधातून प्रियकराची हत्या* *आरोपी जेरबन्द*

*अनैतिक संबंधातून प्रियकराची हत्या*

*आरोपी जेरबन्द*

वर्धा प्रतिनिधी- पंकज रोकडे

वर्धा- दि 12/08/2020 चे रात्री ००: ३० चे सुमारास फिर्यादी श्रावण भीमराव ढुमने यांच्या तोंडी रिपोर्ट वरून माहिती मिळाली की आरोपी नामे विलास उर्फ बालु कासार रा उखंडा, मदणी बोरगाव ता जि, यवतमाळ याने दगडाच्या सहायाने इसम नामे कैलास भीमराव ढुमणे, वय 25 वर्ष, रा, उखंडा मदनी बोरगाव, ता, जि, यवतमाळ याचे तोंडावर, डोक्यावर मारून गंभीर जखमी केले त्यात तो मृतक झाला आहे.
हकीकत अशी की, यातील मृतक कैलास ढुमणे याचे आरोपी ची पत्नी छाया कासार सोबत गेली २ वर्षापासून अनैतिक संबंध असल्या च्या संशय होता मृतक हा त्याचे शांति नगर ,वर्धा येथील नातेवाईकाकडे छाया हीला घेवून ५ दिवसा पूर्वी रक्षा बंधन करीता आला होता, काल दि, १२/०८/२०२० रोजी छाया कासार हीचा पती आरोपी विलास कासार हा सुद्धा शांति नगर येथे आला होता, रात्री २२: ०० वा,तिघे ही पायी चालत धोत्रा, ता, हिंगणघाट येथे विलास कासार याचे बहीणी कडे निघाले, पाऊस जास्त असल्याने ते तिघे नागठाणा येथील शेखर मोटर्स या हायवे लगतच्या गॅरेज च्या शेड मध्ये थांबले, त्या नंतर ते त्या ठिकाणी झोपलेले असताना आरोपी विलास कासार यांने दगडाने कैलास ढुमणे याचे तोंडावर डोक्यावर मारून जखमी केले, व त्या ठिकाणा वरून पळून गेला आहे,
मृतक नातेवाइकाचे फिर्यादी वरून अपराध क्र. 420/20 भा द वि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आरोपी ताब्यात घेऊन आज14/08/2020 रोजी अटक करण्यात आले आहे. सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली सा. अप्पर पोलीस अधिक्षक निलेश मोरे,उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप वर्धा यांचे विशेष मार्गदर्शन व सुचने प्रमाने पोलीस निरीक्षक धनाजी जळक, रामनगर, पोलीस उपनिरीक्षक इटकर व डीबी पथकाचे कर्मचारी करीत आहेत.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …