Breaking News

*राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ची वरोरा येते आढावा बैठक*

*राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ची वरोरा येते आढावा बैठक*


वरोराा प्रतिनिधि जुबेर शेख

वरोरा-दिनांक 16.08.2020 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका वरोरा च्या वतीने मा.श्री. मोरेश्वररावजी टेमुर्डे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सौ. बेबीताई उईके महिला जिल्हाध्यक्ष तसेच वरोरा तालुका पक्ष निरीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली यावेळी जिल्हापरिषद क्षेत्र निहाय, पंचायत समिती निहाय व ग्रामपंचायत स्तरावर पक्ष अधिक बळकट कसा करण्यात होईल यावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच पक्षाच्या काही सेल नवीन पदाधिकाऱ्याच्या नियुक्ती करण्यात आल्या त्यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या वरोरा तालुका अध्यक्षपदी श्री. विजेंद्र बापूरावजी नन्नावरे, शहर अध्यक्ष पदी श्री. अतुल वानखेडे, तालुका ओ. बी. सी सेल च्या कार्याध्यक्ष पदी श्री.मुकेश भीमराव वाटकर व शहर अध्यक्ष पदी श्री. अरुणभाऊ सहारे यांच्या नियुक्तीचे पत्र उपस्थित मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी वरोरा तालुका अध्यक्ष श्री.विशालभाऊ पारखी, युवा नेते श्री. जयंतरावजी टेमुर्डे, माजी पंचायत समिती सदस्य श्री.अविनाशजी ढेंगळे महिला तालुका अध्यक्ष सौं. सुशीलाताई तेलमोरे, युवक तालुका अध्यक्ष श्री. दिनेशभाऊ मोहारे, ओ.बी. सी. तालुका अध्यक्ष श्री. चंद्रकांतजी कुंभारे, सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय भोंगाडे, मुजम्मिल शेख, ओम खिरटकर, श्री.दिलीप पेटकर श्री.तात्यासाहेब चौधरी, श्री.सुरेंद्रजी देठे, श्री. ईश्वर पाटील पावडे, श्री. विजयराव तेलंग, श्री. दिलीप काळे व असंख्य पुरुष व महिला कार्यकर्ते उपस्थित होते….

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …