*वरोरा येथे मनसेत अनेक युवकांचे प्रवेश*
वरोरा प्रतिनिधि जुबेर शेख
वरोरा– मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या विकासासाठी काम करण्यासाठी युवकांचा मनसेत प्रवेश.सन्मानीय राज साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आज शहरातील असंख्य तरुणांनी पक्षप्रवेश करत मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. करोना महामारीच्या काळात वीजबिल आंदोलन असो वा नागरिकांच्या समस्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या साठी आवाज उठवताना दिसत असून अनेक आंदोलने या काळात झाली या सर्वातून प्रेरणा घेत शहरातील असंख्य तरुणांनी आज जिल्हाउपाध्यक्ष प्रशांत जुंजारे मनविसे , तालुका अध्यक्ष गौरव मेले मनविसे, शहर उपाध्यक्ष कल्पक ढोरे यांच्या उपस्थितीत आकाश काकडे , नरेश उपरे , रोहित केशववार , सुमित आसेकर , आकाश नन्नावरे , अमन वनसिंगे , प्रदीप ढवळे , भूषण कठाने , कृष्णा डोरलीकर ,प्रवीण तराळे , मुंडे यांनी पक्षात प्रवेश केला.
मनसे संपली असे बोलणाऱ्यांना ही जोरदार चरकाप असून येत्या काही काळत वरोरा तालुक्यातील अनेक तरुण कार्यकर्ते पक्षात प्रवेश करणार आहे .सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात आदर्श असे कामे करण्याची सुरुवात मनसेचा झेंडा हाती घेऊन युवकांनी केली.
Maharashtra News Media सच की आवाज
