Breaking News

*भामरागड गावात पुराचे पाणी शिरले; कित्येक गावांचा संपर्क तुटला* *सिरोंच़ा तालुका ही अति दक्षते खाली*

*भामरागड गावात पुराचे पाणी शिरले; कित्येक गावांचा संपर्क तुटला*

*सिरोंच़ा तालुका ही अति दक्षते खाली*

गढ़चिरोली प्रतिनिधि-सूरज कुकुडकर

भामरागढ़/सीरोंचा/गडचिरोली- तालुक्यातिल पर्लकोटा नदीला पूर आला असून, पुराचे पाणी भामरागड गावात शिरले आहे. यामुळे अनेक घरे आणि दुकाने पाण्याखाली आली असून, त्या परिसरातील शंभर गावांचा संपर्क तुटला आहे. भामरागडमधील सुमारे ५० कुटुंबीयांनी स्वत: सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे.

*पर्लकोटा भरली*
*नालेही तुडूंब*
*सामान्य जन जीवन विस्कड़ित*

मागील चार-पाच दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने मध्यरात्रीपासून पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागले. हे पाणी भामरागडच्या बाजारपेठेत शिरल्याने नागरिक आणि दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय भामरागड तालुक्यातील जुव्वी आणि कुमरगुडा नाल्यालाही पूर आला आहे. यामुळे शंभर गावांचा संपर्क तुटला आहे. पोलिस जवान आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापन विभागाने तेथे मदत कार्य सुरु केले आहे. इंद्रावती व गोदावरी या नद्याही दुथडी भरुन वाहत आहेत.

*सिरोंचा तालुक्याला सतर्क तेचा इशारा*
सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली नाल्याला पूर आल्याने असरअली-सोमनपल्ली मार्ग, कंबलपेठ नाल्यामुळे जाफ्राबाद मार्ग, वट्रा नाल्याच्या पुरामुळे अहेरी-बेजूरपल्ली मार्ग, गडअहेरी नाल्याच्या पुरामुळे अहेरी-देवलमरी मार्ग, तर गुड्डीगुडम नाल्याच्या पुरामुळे आष्टी-सिरोंचा मार्ग बंद झाला आहे.
शिवाय तेलंगणा राज्यातील मेडिगड्डा धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरील अंकिसा, असरअली परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीला पूर आला असून, पुराचे पाणी गावात शिरले आहे. यामुळे मोठे नुकसान झाले असून, १०० गावांचा संपर्क तुटला आहे.

शासन तत्पर व तैयार
*जनता ही आत्मनिर्भर*
भामरागडमधील सुमारे ५० कुटुंबीयांनी स्वत: सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. मात्र, या क्षणापर्यंत भामरागडमधील आपद्ग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेले नाही, तसेच पूरस्थिती नियंत्रणात आहे, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. मागील चोवीस तासांत भामरागड तालुक्यात सर्वाधिक १२६.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल अहेरी तालुक्यात १०२.४, तर सिरोंचा तालुक्यात १०१.७ मिलिमीटर पाऊस पडला. पुन्हा मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …