Breaking News

*४५० गाय-बैल अशा जनावरांचे अज्ञात रोगापासून संरक्षणासाठी लसीकरण*

*४५० गाय-बैल अशा जनावरांचे अज्ञात रोगापासून संरक्षणासाठी लसीकरण*

*दहेगाव ग्रामपंचायतचा पुढाकार*

वरोरा प्रतिनिधि जुबेर शेख

वरोरा :- तालुक्यातील दहेगांव ग्रामपंचायतच्या सरपंच विशाल पारखी यांच्या पुढाकाराने वतीने पाळीव जनावरांवर आलेल्या लम्पी स्किनसदृश आजाराची रोग प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यात आली असून आज सोमवार रोजी ४५० पेक्षा गाय-बैल अशा जनावरांना ही लस देण्यात आली आहे . ही लस लगतच्या १० गावांना विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्धार यावेळी सरपंच विशाल पारखी यांनी व्यक्त केला .
गावातील नागरिकांसाठी आरोग्य शिबीर घेण्या सोबतच शेतकऱ्यांच्या शेतीसाठी उपयोगी पडणाऱ्या बैल-गाय या सारख्या जनावरांवर अनोळखी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने यावर लम्पी स्किन सदृष्य रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत असल्याने गावकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक केले आहे. सदर विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ राहुल घिवे यांच्या कडून हे लसीकरण करण्यात आले. ग्रामपंचायत चे काम फक्त रोड, नाली बनविणे,लाईट लावणे,साफसफाई करणे एवढे च नसून गावातील शेतकऱ्यांवर संकट आले तर त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहणे हे देखील आहे हे या माध्यमातून सरपंच विशाल पारखी यांनी दाखवून दिले आहे. लसीकरण कार्यक्रमाला सरपंच विशाल नानाजी पारखी, उपसरपंच कविता घुगल , ग्रामसचिव टी एम लांजेवार ,डॉ राहुल घिवे( चरूरंखटी),डॉ बंडु आकनुरवार फि. प. चि वरोरा,
डॉ आंबोरकर चिकनी, शिपाई युवराज मेश्राम ,शिपाई सलिम पठान यांचेसह गावकरी उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …