Breaking News

*पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस कर्मचारी व वीज केंद्रातील महिला अभियंता पॉझिटिव्ह* *६९ पोलीस कर्मचारी निगेटिव्ह*

*पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस कर्मचारी व वीज केंद्रातील महिला अभियंता पॉझिटिव्ह*

*६९ पोलीस कर्मचारी निगेटिव्ह*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी प्रतिनिधी दिलीप येवले.

खापरखेडा:- स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस कर्मचारी व वीज केंद्रातील एक महिला अभियंता कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली असून चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत असलेल्या परिसरात कोरोना बाधित रुग्णांनी शंभरी गाठली असून ६९ पोलीस कर्मचारी निगेटिव्ह आल्यामुळे काही प्रमाणात सुटकेचा श्वास सोडला आहे.
चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत चिचोली, खापरखेडा, भानेगाव, वलनी, पोटा, सिल्लेवाडा, बिनासंगम, सुरादेवी असे एकूण आठ उपकेंद्र कार्यरत आहेत सदर उपकेंद्रा अंतर्गत जवळपास शंभर कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
खापरखेडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक यांना घसा व सर्दीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी १६ आगस्टला के. टी. नगर उप प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅपिड अंटीजेन चाचणी करवून घेतली सदर चाचणी पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती मिळाली असून एका पोलीस कर्मचाऱ्याची चाचणी १५ आगस्टला पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती आहे खापरखेडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती कळताच १७ आगस्ट सोमवारला ७० पोलीस कर्मचाऱ्यांनी रॅपिड अंटीजेन चाचणी करवून घेतली सदर चाचणीत ६९ पोलीस कर्मचारी निगेटिव्ह तर एक पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती आहे शिवाय वीज केंद्राच्या प्रकाशनगर वसाहतीत राहणाऱ्या एक महिला अभियंता पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती मिळाली असून त्या सौदामिनी कार्यालयात कर्तव्यावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र त्या बरेच दिवसांपासून रजेवर असल्याची माहिती मिळाली आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …