*सिल्लेवाडा येथे मर्डर तर एक जण जखमी एकाचा मृत्यू*

*सिल्लेवाडा येथे मर्डर तर एक जण जखमी एकाचा मृत्यू*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

खापरखेडा:- सिल्लेवाडा येथे सायंकाळी पाच वाजता आरोपी सिद्धनाथ यादव आणि अमरनाथ यादव या दोन भावांनी मिळून लाली हसन खान आणि जाहिद हसन खान या दोन भावांना लोखंडी पाईप ने मारहाण केली आणि दोघेही फरार झाले. लाली खान याचा कामठी उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर जाहिद वर उपचार सुरू आहे. ही घटना सिल्लेवाडा येथील वार्ड क्र. 4 येथे आरोपी सिद्धेश्वर याचा घरा समोर घडली. मिळालेल्या माहिती नुसार मजुरीचे पैसे घेऊन सिद्धेश्वर घरी जात होता दरम्यान लाली ने त्याचा जवळचे १६०० रुपये हिसकावून घेतले आणि त्याचा गालावर चोप देऊन निघून गेला. सिद्धेश्वर घरी गेला त्याचा मागे लाली व त्याचा भाऊ जाहिद दोघेही त्याचा घरी येऊन मारपीट सुरू केले हे बघून अमरनाथ तेथे आला सिद्धेश्वर याने लोखंडी पाईप ने मारून लाली व जाहिद ला गंभीर जखमी केले.

घटना स्थळावरून लाली व जाहिद ला त्याचा मित्रांनी उचलून आशा हॉस्पिटल कामठी येथे नेले. घटने ची माहिती मिळाल्यावर घटनास्थळावर खापरखेडा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण ची टीम पोहचली. स्थानिक गुन्हे शाखेचे विरेंद्र नरड, खापरखेडा पोलीस स्टेशन चे नितेश पिपरोदे आणि नुमान शेख या तिघांनी मिळून गुप्त माहिती च्या आधारावर अंकित यादव यांच्या घरून सिद्धेश्वर आणि अमरनाथ याना ताब्यात घेतले. पोलिसांनी लोखंडी पाईप जप्त केला. घटनास्थळावर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी भेट दिली. ठसे तज्ञ चमू ही पोहचला आहे. दोन्ही आरोपीस कलम ३०२, ३४ अंतर्गत अटक केली.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …