Breaking News

*आयुध निर्माणी चांदा कडून पिनाका रॉकेट देशाला समर्पित* *चंद्रपुर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा*

*आयुध निर्माणी चांदा कडून पिनाका रॉकेट देशाला समर्पित*


*चंद्रपुर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा*

 

वरोरा प्रतिनिधि जुबेर शेख

वरोराचांदा आयुध निर्माणी येथे तयार झालेले पुर्णपणे स्वदेशी बनावटीचे पिनाका रॉकेट चे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने उदघाटन केले.यावेळी संरक्षण उत्पादन सचिव राजकुमार आणि आय आय एस चे महासंचालक तथा आयुध निर्माणी मंडळाचे अध्यक्ष हरी मोहन उपस्थित होते.
पिनाका रॉकेट असेंम्बली लाईन संपुर्ण स्वदेशी संकल्पनेवर आधारित असून देशातील स्वदेशी तंत्रज्ञानाने साडे तेरा कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आली आहे. तसेच ही प्रणाली गोदरेज आणि बायसी कंपनीच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. चांदा आयुध निर्माणी मधील रॉकेट कॉम्प्लेक्स मधील सिस्टिम पूर्णपणे स्वयंचलित आणि आधुनिक गुणवत्ता नियंत्रण प्रणाली सह विकसित केली आहे .ही प्रणाली सर्व प्रकारची सुरक्षा मानके आणि उत्पनाच्या गुणवत्तेची चाचणी घेते.स्वयंपूर्ण भारताच्या दिशेने एक मोठं पाऊल भारताने टाकले आहे .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …