*शमीविघ्नेशाचा अभिषेक*

*देवस्थान समितीचे सचिव अँड् श्रीकांत पांडे यांनी ब्रम्ह मुहूर्तावर केले पुजन*
सावनेर प्रतिनिधी दिनेश चौरसीया
*सावनेरः सावनेर शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक मानल्या जाणाऱ्या श्री अदोश क्षेत्र आदासा येथील शमीविघ्नेशाचा मंदिरात देवास्थान समितीचे सचिव अँड् श्रीकांत पांडे यांचे हस्ते सपत्नीक गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर आज पाहटे स्वयंभू श्री शमीविघ्नेश गजाननाचा अभिषेक पुजन व आरती करुण्यात आले*

*वाढत्या कोरोना संसर्गात शासनाच्या दिशानिर्देशाचे पालन करुण मंदिर व्यवस्थापन मंडळाने होऊ धातलेला गणेशोत्सव सर्व भाविकांनी सुरक्षिततेत साजरा करावा असे आवाहन याप्रसंगी करत कोरोना या महामारीच्या संकटा पासुन समस्त देशवासीयांना व भाविकांचे संरक्षण कर असे श्रीगणेशाला साकडे घातले*
Maharashtra News Media सच की आवाज