*पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांची दुपटी भुमिका* *आपले ठेवा झाकून,व इतरांचे पहा वाकून* *भाजप प्रदेश सचिव अँड् धर्मपाल मेश्राम यांचा घणघणीत आरोप*

*पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांची दुपटी भुमिका*

*आपले ठेवा झाकून,व इतरांचे पहा वाकून*


*भाजप प्रदेश सचिव अँड् धर्मपाल मेश्राम यांचा घणघणीत आरोप*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*

*नागपूरएकीकडे एकापाठोपाठ एक गंभीर गुन्ह्यांनी पालकमंत्र्यांचे शहर हादरत आहे.गु्ह जिल्ह्यातीलच राज्याचे गु्हमंत्री अनील देशमुख आणी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत हे नागपूर शहरातील असुन मात्र सुरक्षा संदर्भात कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही.याऊलट डॉ नितीन राऊत उत्तर प्रदेशातील दलितांवरील अत्याचाराविरोधात न्यान मागन्यासाठी जातात म्हणजेच”आपले ठेवा झाकून व इतरांचे पहा वाकून”असा खणखणीत आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव व मनपाचे विधी समितीचे सभापती अँड् धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे*

*एकिकडे स्वतःच्या मतदारसंघातील स्वतःच्या पक्षाच्या दलित समाजातील माजी नगरसेवकाची निर्घृणपणे हत्या केली जाते.त्यावर कोणत्याही प्रकारची भुमिका न घेता सद्रुष्य मौन पाळने व परराज्यातील दलितांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उचलण्यास जाणे ही दुपटी भुमिका नाही तर काय…?,*


*गेल्या काही दिवसा आधी महापालिकेत त्यांचे स्वतःच्या मतदार संघातील व काँग्रेस पक्षाचे दोनदा नगरसेवक राहिलेले देवा उसरे यांची भरदिवसा निर्घृणपणे हत्या करण्यात आली.सदर घटनेचे तपासकार्य संथगतीने सुरु आहे,या चौकशी संदर्भात पालकमंत्री व गु्हमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून कोणतीही ठोस भुमीका घेण्यात आली नाही. महाराष्ट्रात दिवसेंदिवस दलित समाजावरील अत्याचारात वाढ होत आहे.काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना,त्यापुर्वी राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यातील अरविंद बन्सोड या तरुणाचा खून करण्यात आला.यावर पालकमंत्री व गु्हमंत्री नात्याने तसेच महाविकास आघाडी ने कठोर पाऊले उचलन्याचे बाजुला सारुन आपल्या आंगणात होत असलेल्या दलितांवरील अत्याचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन परराज्यातील दलितांसाठी लढण्याची महाविकास आघाडीची भुमिका म्हणजे म्हणजे पक्षश्रेष्ठींना खुश करण्याखेरीज काही नाही असा प्रश्नही भाजपा प्रदेश सचिव अँड् धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …