*ग्राम पंचायत चिचोली खापरखेडा येथे प्लास्टिक मुक्त अभियान राबविण्यात आला*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
खापरखेडा:- दिनांक 24/08/2020 रोजी ग्रामपंचायत चिचोली खापरखेडा येथे प्लास्टिक मुक्त अभियान कार्यक्रमाचे संपूर्ण जिल्ह्यात अभियानाची नियोजनानुसार सावनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये “प्लास्टिक मुक्त अभियान” कार्यक्रमा मध्ये ग्रामपंचायत चिचोली खापरखेडा येथे नियोजन करण्यात आलेले आहे कार्यक्रमाची सुरुवात फक्त “स्वच्छतेची शपथ” घेवुन करण्यात आली तसेच गावांमध्ये फिरून गावातील प्लास्टिक गोळा करण्यात आले. लोकांमध्ये जनजागृती व्हावी व सिंगल युज प्लास्टिक वापर कमी करावा व त्यांना प्लास्टिक मुक्त ग्रामपंचायत व्हावी याकरिता अभियानाचा उद्देश समोर ठेवून संपूर्ण जिल्ह्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद नागपूर श्री शेट्टी साहेब, गट विकास अधिकारी पंचायत समिती सावनेर अनिल नागणे साहेब, विस्तार अधिकारी (पंचा) गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) पंचायत समिती सावनेर बि.आर.सी. व सी.आर.सी. तसेच मा. सरपंच श्री. चांदेकर साहेब व ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामविकास अधिकारी चिचोली खापरखेडा श्री लंगडे यांनी आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वेकरिता सहकार्य केले.
Maharashtra News Media सच की आवाज