*वरोरा शहरात होऊ शकतो लॉकडाउन?*
*चौकाचौकात चर्चांना उधाण*
वरोरा प्रतिनिधि मूजम्मिल शेख
वरोरा– लॉकडाउन घोषित झाल्यापासून वरोरा शहरात कोरोनाचा फारसा काही प्रभाव जाणवला नाही.कोरोना चे रुग्ण अगदी बोटावर मोजता येईल असेच होते .परंतु मागील काही दिवसापासून अनलॉक सुरू झालं आहे .त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुरु झाला आहे .मागील काही दिवस आधी कर्मवीर वॉर्ड येथे एक रुग्ण आढळला त्यानंतर अचानक लक्ष्मी नगर येथे रुग्ण आढळला आणि अचानक कोरोना बाधितांची संख्या एकाच दिवशी 13 झाल्याने प्रशासन कामाला लागल आहे .वरोरा उपजिल्हा रुग्णालयातील कोरोनामुळे डॉक्टर यांच्या मृत्युने वरोरा शहर हादरल आहे.23 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयातील एक अधिकारी कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तहसील कार्यालय पूर्णपणे बंद केलं आहे .सदर सर्व परिस्थिती पाहता वरोरा शहर काही दिवसांसाठी लॉकडाउन होऊ शकते अशी चर्चा आहे .परंतु अधिकृत अशी कोणतीच माहीती प्राप्त झालेली नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये .घरी राहून प्रशासनाला सहकार्य करावे.
प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसून वरोरा लॉक डाउनबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे प्रशासनाने यावर त्वरित दिशा निर्देश द्यावे जेणेकरून नागरिकाममध्ये संभ्रम दूर होईल.घरी राहा, सुरक्षित रहा,प्रशासनाला सहकार्य करा.
Maharashtra News Media सच की आवाज