Breaking News

*मुसळधार पाऊस महाराष्ट्राला झोडपणार….!*

*मुसळधार पाऊस महाराष्ट्राला झोडपणार….!*

विशेष प्रतिनिधि

*मुंबईसप्टेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनचा जोर पुन्हा वाढेल,असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.* दुसरीकडे राज्यातील काही भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असतानाच शुक्रवारी ब-यापैकी ऊन्हाचा तडाखा बसल्याचे चित्र होते.मुंबईसह राज्यभरात मान्सूनने विश्रांती घेतली असली तरीदेखील भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण,गोव्यात ब-याच ठिकाणी,मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. ५ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. ६ सप्टेंबर रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. ७ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल *दि. ८ सप्टेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. ५ आणि ६ सप्टेंबर रोजी मुंबई शहर आणि उपनगरात सायंकाळी,रात्री आकाश अंशत: ढगाळ राहील. हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल,अशीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …