*बेरोजगार युवकांना रोजगार द्या,अन्यथा रस्त्यावर उतरू- राजेश खंगारे*

*बेरोजगार युवकांना रोजगार द्या,अन्यथा रस्त्यावर उतरू- राजेश खंगारे*


सावनेर प्रतिनिधी दिनेश चौरसीया
सावनेर –दि. 8/9/2020 ला सावनेर नागपुर जिल्हा व सावनेर विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने सावनेर- कलमेशवर विधानसभा अध्यक्ष राजेश खंगारे यांच्या नेतृत्वात तहसीलदार साहेब सावनेर यांना निवेदन देवून ” रोजगार दो ” अभियानाची शुरुवात करण्यात आली*


*याप्रसंगी नागपुर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष अमोल केने,महासचिव राहुल ढ़ोंगड़े, श्रीकांत हजारी, सावनेर शहर अध्यक्ष प्रफुल सुपारे, मुकेश इंगोले, राज चक्रवर्ती, विष्णु कोकडडे, विजय पन्नामी, रूपेश कमाले, मोहीत बारसकर, अजय डाखोड़े, राज चक्रवरती, उपस्तिथ होते*

*नोटबंदी मुळे भारतात सर्वात जास्त रोजगार निर्मिति करणाऱ्या कृषि व सुक्षम लघु-मध्यम क्षेत्राला फटका बसला.वस्तु सेवा कराच्या ( GST ) चुकीच्या अमंल-बजावनीमुळे कुटीर-लघु- मध्यम क्षेत्राचे आनी उद्दोगांचे पार कम्बरड़े मोडले गेले.*


*भारतीय संख्येकी आयोगाच्या ( NSA ) अहवालानुसार देशात 2017-2018 या वर्षात बेरोजगारिचा दर 6.1 असुन ग्रामीण भागातला बेरोजगारिचा दर 5.3 टक्के होता तरी शहरी भागात 7.8 टक्के वाढला तरुणामध्ये बेरोजगारिचा दर सर्वाधिक म्हणजे 13 ते 27 टक्क्या वर पोहोचला आहे.*

*नियोजन न करता लॉकडावुन लादल्यामुळे 12 ते 13 करोड़ लोक बेरोजगार झाले.*

*भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात ( GDP ) चा दर सरलेल्या अप्रिल ते जून या तिमाहित 0 खाली घसरून -23.9 टेक्क्याने खाली आले आहे*
*त्यामुळेच बेरोजगारी ही झपाट्याने वाढत असुन नैसर्गिक आपत्ती मुळे शेती, शेतकरी, शेतमजूर यांचीही अवस्था दयनीय झाली असल्याचे निवेदनातून म्हटले असुन केन्द्र शासनाने युवकांना लवकरात लवकर रोजगार उपलब्ध करुण न दिल्यास युवक काँग्रेसचे वतीने आंदोलनात्मक पाऊल उचलण्याचा इशारा ही याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे सावनेर कळमेश्वर विधानसभा अध्यक्ष राजेश खंगारे यांनी दीला*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …