Breaking News

*कसरत करण्यासाठी गेलेल्या बालकाला नेले वाघाने* *जंगलात सापडला बालकाचा मृतदेह*

*कसरत करण्यासाठी गेलेल्या बालकाला नेले वाघाने*

*जंगलात सापडला बालकाचा मृतदेह*

तालुका प्रतिनिधी- धनराज कोहळे
सावली- तालुक्यातील कापसी गावातील एक 10 वर्षाच्या मुलाला वाघाने/बिबट्याने उचलून नेले. कापसी गावातील भरपूर युवक हे कसरत करण्यासाठी रोज कापसी ते व्याहाड मार्गावर रोजच सकाळी 4 ते 5 वाजता कसरत करण्यासाठी जात असतात. आज सुध्या व्यायाम करण्यासाठी गावातील मूल गेले असता संस्कार सतीश बुरले नामक मुलावर वाघाने/बिबट्याने झडप घातली व त्याला उचलून जंगलात नेले. यातच त्याचा मृत्यू झाला आहे. कापसी परिसरात अनेकदा वाघ/बिबट्याने कापसी गावातील अनेक गुरेढोरे मारले आहेत. वाघ/बिबट यांचा वावर कापसी जंगल परिसरात वाढलेला आहे. आज एक निष्पाप मुलाचा बळी वाघाने/बिबट्याने घेतला. झालेल्या घटनेची माहिती वनविभाग आणि पोलीस प्रशासन यांना देण्यात आलेली आहे. या घटनेमुळे कापसी वासीय तसेच आजूबाजूच्या गावात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. मृत्यू पावलेल्या बालकाच्या परिवारावर एक दुःखद शोककळा निर्माण झालेली आहे. तसेच संपूर्ण कापसी गावात झालेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त करत आहेत.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …