*अजुन एक कर्मठ पत्रकार कोरोनानी दगावला*

*मराठी पत्रकार परिषद मुंबई द्वारे भावपूर्ण श्रध्दांजली*
विशेष प्रतिनिधि
*रायगड जिल्ह्यातील माथेरान चे पत्रकार व मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस संतोष पवार यांचे थोड्या वेळापूर्वी कोरोना मुळे दुःखद निधन झाले , आज सकाळी त्यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होत असल्यामुळे माथेरान च्या हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले परंतु तेथे व्हेंटिलेटर नसल्यामुळे त्यांना कर्जत येथे हॉस्पिटल मध्ये नेले जात असतानाच वाटेत त्यांनी प्राण सोडला , एक उमदा पत्रकार संतोष पवार यांच्या निधनाने काळाने हिरावून नेला आहे , कोरोना मुळे राज्यात आता आता पत्रकार स्व.पांडुरंग रायकर व आता च पत्रकार संतोष पवार यांच्या सह १२ पत्रकारांचे कोरोन मुळे मरण पावले आहेत , अत्यंत दुःखद घटना आहे , कृपया फिल्ड मध्ये काम करणाऱ्या पत्रकारांनी सतर्कता बाळगावी व स्वतःचे व कुटुंबाचे रक्षण करावे , कोरोना चे संक्रमण वाढत आहे कृपया काळजी घ्या, स्व.संतोष पवार यांना मराठी पत्रकार परिषद मुंबई तसेच महाराष्ट्र न्युज मिडिया परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली*
Maharashtra News Media सच की आवाज