Breaking News

*नागपूरचे नृत्य दिग्दर्शक अक्षय चौधरी यांची सिनेमा क्षेत्रात यशस्वी उडाण*

*नागपूरचे नृत्य दिग्दर्शक अक्षय चौधरी यांची सिनेमा क्षेत्रात यशस्वी उडाण*

 

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*

मुंबई- मुंबई ही सिनेसृष्टीची मायानगरी असुन वेगवेगळ्या क्षेत्रात आपली कला देण्याचे प्रयत्नकरीत असते. तसेच महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील अक्षय चौधरी यांनी मराठी रंग भुमीवर आपले प्रभुत्व गाजवले आहे.सर्वसामान्य कुटुंबातुन घडलेला अक्षय याच्या नृत्य कलेने मराठी सिनेसृष्टीत ५ सप्टेंबर २०२० रोजी अतीशय सुंदर व मनाला मोहुन टाकेल असे गाणं प्रस्तुत केले आहे. दैनंदीन जीवन जगत असताना देखील अक्षय याने आपले नृत्य दिग्दर्शक बनण्याचे स्वप्न यशस्वीरित्या पुर्ण कले आहे.

“मनाया सुटलाय ताबा गो” या गाणं नृत्य दिग्दर्शक अक्षय चौधरी यानी अलीबाग येथे चित्रीकरण केले. यामध्ये प्रमुख भुमीका प्रिया सरकाटे,राहुल रेड्डी यांनी निभावली आहे.या गाण्याये दिग्दर्शक शुभम गायकी, अजीत गाडे, संगितकार तेजस पडावे .गीतकार किरण घाणेकर , गायक केवल वलंज आणि सोनाली सोनवणे , छायाचित्रीकरण सचीन चीलप आणि अमित खंडागळे यांनी केले.
अक्षय चौधरी यांची यशाची ही पहीली पायरी असुन समोर प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक होण्याच्या वाटचालीकडे हे पहिले पाऊल आहे.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …