*सावनेर तालुक्यात 1087 रुग्णांची नोंद*
*636 रुग्णांनी केली कोरोनावर मात तर 14 दगावले*
*कोरोना लागन झालेले 437 एक्टिव्ह*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत सुरज सेलकर*
*सावनेरः तालुक्यातील कोरोना विषाणूंची लागन झालेल्या रुग्णांनी हजारी गाठली असुन 1087 ही संख्या सध्याच्या घडीला आहे व ही संख्या दिवसेंदिवस वाढतच राहणार*
*सावनेर तालुक्यातील शासकीय औधोगीक प्रशिक्षण केन्द्र सावनेर,प्राथमिक आरोग्य केन्द्र खापा,बडेगाव,पाटनसावंगी,केळवद,चिचोली या सहा ठिकाणी कोविड़ 19 च्या निशुल्क तपासणीची सोय शासनाने उपलब्ध करुण दिली असुन अनेक खाजगी डाँक्टर व पँथेलाँजी लँब मधेही तपासणी होत आहे*
*दि.8 सप्टेंबर पर्यंत तालुक्यात एकूण 1087 रुग्णांना कोरोना विषाणूंची लागन झाली असल्याची नोंद असुन त्यातील 636 रुग्णानी कोरोनावर मत केली असुन या संसर्गजन्य आजाराने तालुक्यातील 14 रुग्णांना आपला जिव गमवावा लागला आहे तर आजच्या घडीला तालुक्यात 437 एक्टिव्ह रुग्णांची नोंद असुन त्यातील काही रुग्ण नागपूरच्या मेओ,मेडिकल सह खाजगी रुग्णालयात व घरीच विलगीकरण करुण त्यांचेवर उपचार सुरु आहे*
*मागील पाच महिन्यापासून कोवीड़19 विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाची दमझाक होत असुन प्रशासकीय कर्मचाऱ्यांत आता पहिल्या सारखा दम दिसुन येत नाही केन्द्र व राज्य शासनाच्या अनलाँक धोरणामुळे नागरीकांना स्वच्छंदपणे वावरण्याची जणुकाही मुभाच उपलब्ध झाल्याचे चित्र असुन रस्त्यावर नागरिकांची उसळणाऱ्या गर्दीतून अनेकांच्या तोंडावर मास्क नाही,सोशल डिस्टंसींग नाही,दुचाकी वाहनावर डबल तीबलसीट तर तीन चाकी चारचाकी वाहनामधे एकलाएक रेटून अश्या अवस्थेमुळे ही रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे जाणकारांचे मत आहे तर दुसरीकडे शासनाचे मंत्री,जिल्हाधिकारी, आयुक्त,तहसीलदार,तहसील कर्मचारी, नगर प्रशासनाचे कर्मचारी,पोलीस अधिकारी कर्मचारी, आरोग्य सेवक,आशा वर्कर पत्रकार बांधव आदिंनाही मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूंची लागन झाल्याने सर्व कर्मचारी अधिकारी धस्तवल्या स्थितीत असल्यामुळे जमिनी स्तरावर पुर्वी सारखी सख्ती दिसून येत नाही*
*कायचा कोरोना न फोरोना*
*शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना आता या जिवघेण्या संसर्गजन्य कोरोना विषाणूंची मुळीच भीती नसल्याचे चित्र बघावयास मीळत असुन अनेक नागरिक तर म्हणतात की “कायचा कोरोना न फोरोना” सगळ चुतीया बनवीण्याचा धंदा जे होईन ते पाहल्या जाईन अश्या मोड़ मधे आता नागरिकांच्या प्रतिक्रिया येत असुन काहींच्या मते तर “कोरोना से डर नही लगता साहेब,डर तो लगता है होम कोरंटान से” असे मत व्यक्त करणार्यांची संख्या ही कमी नही.सोबतच सोशल मीडिया,युट्यूब, फेसबुक, वाटसप वरुण वायरल होणारे व्हिडीओ व मँसेज तसेच बातम्यांमुळे नागरिक अधिकच धस्तावले आहेत.त्यामुळेच जर आपण कोवीड़ 19 च्या टेस्टींग ला गेलो व पाँजेटिव्ह आढळलो तर आपल्यासोबत ही अशीच परिस्थिती तर होणार नाही ना अशी भयावह स्थीती निर्माण झाली आहे*
*मनातील भीती दुर सारुन ताप,सर्दी, खोकला असे लक्षणे आढळताच आपण कोवीड़ 19 ची तपासणी करुण घ्यावी असे मत कोवीड़ 19 तपासणी विभागाचे प्रमुख चिकित्सक डॉ. संदीप गुजर,डॉ. हरिष बरैय्या यांनी नागरिकांना केली आहे*

*दररोजच्या वाढत्या कोरोना विषाणू बाधितांची संख्या व दगावणार्या रुग्णांचे आकडे बघता महाराष्ट्र न्युज मीडियाच्या वतीने नागरिकांना निवेदन करण्यात येते की आपण शासनाने निर्गमित केलेले दिशानिर्देशाचे पालन करुण तसेच कोरोना सदु्ष्य लक्षणे आढळताच आपण आपली कोवीड़ 19 ची तपासणी करुण आपल्या व आपल्या परिवारासह स्थानिक प्रशासनास मदत करावी*
Maharashtra News Media सच की आवाज