*आरोग्य केन्द्र खापा येथे उपयोगी वस्तू भेटे* *शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुप्त उपक्रम* *आरोग्य केन्द्राच्या समस्या मा.मुख्यमंत्री,आरोग्य मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या निदर्शनास आणून सोडवण्यासाठी पुर्ण प्रयत्न करु- राजेश बावने*

*आरोग्य केन्द्र खापा येथे उपयोगी वस्तू भेटे*

*शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुप्त उपक्रम*

*आरोग्य केन्द्राच्या समस्या मा.मुख्यमंत्री,आरोग्य मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या निदर्शनास आणून सोडवण्यासाठी पुर्ण प्रयत्न करुराजेश बावने*

 

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत सुरज सेलकर*

*सावनेरः तालुक्यातील खापा आरोग्य केन्द्र येथे आरोग्य केन्द्राला उपयोग साहित्य भेट देऊण शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष राजेश बावने यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी यांनी आपल्या सामाजिक जाणीव चा परिचय दीला*

*ग्रामीण क्षेत्रातील आरोग्य सोई सुविधा कश्या पध्दतीने हाताळल्या जातात हे संर्व विदितच आहे.आरोग्य केन्द्रात उपलब्ध असलेल्या साधन सुविधांचा वापर करुणच रुग्णांचा उपचार करावा लागतो यात काही दुमत नाही व म्हणूनच आरोग्य सेवा देणार्यांची कुचंबणा होते व डॉक्टर ग्रामीण भागात सेवा देण्याचे टाळतात. असाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांना खापा आरोग्य केन्द्रात कचरा संकलन पेट्या,रुग्णांकरीता पाण्याच्या बादल्या व इतर साहित्याचा तुटवडा आढळून येताच खापा शहर राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः काही निधी गोळा करुण सहा कचरा संकलन बकेट,सहा बादल्या,मग व इतर इतर साहित्य भेट करुण आपले सामाजिक दाईत्वाचा परिचय दिला*

*तसेच प्राथमिक आरोग्य केन्द्र खापा येथील कर्मचार्यांची कमतरता,सफाई कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी तसेच इतर साहित्य आदिंची नितांत आवश्यकता असुन ती पुर्तता करण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,आरोग्य मंत्री राजेश टोपे सह जिल्हा आरोग्य अधिकारी आदिंना नीवेदन प्रस्तुत करुन मागणी करण्यात येईल तसेच मागणी मान्य न झाल्यास आंदोलनात्मक पाऊल उचलन्याची ही आमची तयारी असलेल्याचे याप्रसंगी बोलून दाखवीले*

*तर प्राथमिक आरोग्य केन्द्र खापा येथील आरोग्य अधिकारी डॉ शंकरवार मँडम यांनी शहर राष्ट्रवादी पक्षाव्दारे पुरविण्यात आलेल्या भेटवस्तू बद्दल त्यांचे आभार मानत यि कोरोना काळात विशेषतः ग्रामीण भागात आरोग्य सेवेवर कार्य करताना त्यांना येत असलेल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ही आपण मदत करावी अशी विनंती याप्रसंगी केली*

*याप्रसंगी राजेश बावणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खापा शहर अध्यक्ष,मकसुद शेख राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्ष,फिरोज शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक खापा शहर अध्यक्ष,आकाश बारापात्रे मिडिया सेल अध्यक्ष खापा शहर,विद्याताई तुमाणे महिला काँग्रेस राष्ट्रवादी खापा शहर अध्यक्षा अशोक बारापात्रे माजी नगर सेवक,लिलाधर धार्मिक, धर्मेंद्र बेंडे,गजानन गोखे,चरण गजबे,किशोर कुंडलकर, हर्षल बोकडे,नितेश नंदनवार,हरिष निमजे,अनिल शेंदरे, मोरेश्वर कवडे,डाॅ शंकरवार मॅडम आरोग्य अधिकारी,बन्सोड सर ophth officer,पाॅलजी,HA,गायकवाडजी HA,सातपुते मॅडम p.o,शेख HA,महाजन बाबू ,वनिता परिचारीका,अर्चना परिचारीका,सारिका परमोरे इतर कर्मचारी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी गण प्रामुख्याने उपस्थित होते*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …