*बेलोना येथे ” पंचायत समिती व कोशिश फाऊंडेशन” च्यावतीने
जनावरांवर लपी रोग संबंधाने जनजागृती व औषध वितरित करून पार पडले जनावरांचे शिबिर*

बेलोना प्रतिनिधी :चंद्रशेखर मस्के
बेलोना- इथे मोठी ग्राम पंचायत असून येथील आजू बाजू चे गट ग्रामपंचायत आहे या नरखेड तहसील मधे झालेल्या अवकाळी पावसामुळे संत्रा मोसबि स्वयाबीन मका पऱ्हाटी याना खूब मोठा नुकसानीचा फटका बसला आहे .परिसरातील बेलोना तसेच आजू बाजूचे लहान लहान खेडे गावामधे मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय चातल आहे परंतु बेलोना येथे गुरांना कसलाही आजार झालं की उपचार करण्याकरिता बाहेर गाव वरून डॉकटर बोलावे लागतात तसे या गावात पशूवेद्येकिय दवाखाना असून डॉकटर साठी राहण्याची उतम व्यवस्था आहे परंतु आठवड्यातून येथे दोन दिवस डॉकटर येत असल्याने बेलोना तसेच आजूबाजूचे शेतकरी बांधवांना जनावरांच्या आजार उपचारासाठी /4/5किलोमीटर पायदळ नरखेड किंवा मोवाड येथे आपले गुरे घेऊन जावे लागतात त्यासाठी त्यांना खूब त्रास सहन करावा लागतो त्यामुळे त्यांची भरपूर नाराजी आहे . कोरोना मुळे सुशिक्षित बेरोजगारांना तसेच ज्याच्या नोकऱ्या गेल्या आहेत अश्याना रोजगाराची नवीन सधी म्हणून दूध व्यवसाय कडे लक्ष केंद्रित केले परंतु या नवीन लपी स्किन रोग आजाराने जनावरांना संपूर्ण शरीरावर गाठी येत असल्यामुळे चेंतेची बाबा निर्माण झाली आहे.
त्यासाठी कोशिश फाऊंडेशन च्यावतीने व पंचायत समितीच्या वतीने बेलोना येथे पशूवैद्यकीय दवाखान्यात लपी रोगावरती शिबिर घेण्यात आले या शिबिरात बेलोना सरकल मधील पंचायत समिती सदस्या जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती मधील पशुवद्यकिय डॉकटरचा समूह तसेच मोवड पाशुवद्येकिय डॉकटर या शिबिरात उपस्थितीत राहून पशू हा निरोगी होईल त्यासाठी प्रयत्न करत राहू तसेच गावकरी जनतेनी या पशू वैद्यकीय दवाखान्यात रोजच डॉकटर रहावा यासाठी मागणी करत गावातील दूध व्यवसाय वाढेल आणि गावातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार आणि शेतकऱ्यांच्या पशुची समस्या लवकर सुटेल याकडे शासनाने लक्ष द्यवे अशी गावकरी जनतेची मागणी आहे . या शिबिरात गावकरी जनतेनी मोठ्या संख्येने आपल्या जनावरांना लपी रोगाची लस देऊन शिबिराची शोभा वाढवली आणि आपल्या जनावरांना लपी रोग होणार नाही आणि झाल्यास तो कसा बरा होईल याची माहिती त्यांना या शिबिरात मिळाली .
Maharashtra News Media सच की आवाज