*सावनेर च्या दहावीच्या विद्यार्थ्यांना मुंबई परीक्षा केंद्र प्रकरणात मिळाला न्याय*


*प्रसार माध्यमांनी प्रखरतेने बातम्या प्रकाशित केल्यामुळे मिळाला न्याय- अँड्.अरविंद लोधी*
सावनेर प्रतिनिधी- सुरज सेलकर
सावनेर- मार्च 2019 च्या दहावीच्या CBSE परीक्षेत सावनेर तालुक्यातील काही विद्यार्थी काही विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्यांनी दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी फॉर्म भरला, 23 सप्टेंबर 2020 पासून पुरवणी परीक्षा सुरू होणार असल्यामुळे नुकतेच विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेचे परीक्षा प्रवेश पत्र (हॉल तिकीट) आल्यावर धक्काच बसला होता कारण त्यांना पुरवणी परीक्षेसाठी ठाणे, कल्याण, मुंबई येथे सेंटर देण्यात आले होते. परीक्षा तोंडावर असताना व कोणाच्या काळात 800km जायचे कसे, राहायचे कुठे, अभ्यास कसा करायचा, कधी मुंबई बघितली नाही अशा परिस्थितीत मुलांसह पालकांवर संकट उभे झाले होते व शाळेने सुद्धा हात वरती केले.*

*अनेक पालकांनी व मुलांनी दि. 20\09\2020 ला सावनेर पालिकेचे उपाध्यक्ष एडवोकेट अरविंद लोधी यांची भेट घेतली व या प्रकरणात मदत करण्याची विनंती केली, त्यानुसार ही लोधी यांनी CBSE बोरच्या चेन्नई दिल्ली व पुणे येथील कार्यालयात संपर्क करून या मुलांना नागपूर जिल्ह्यात सेंटर देण्याची मागणी केली व योग्य रीतीने मागणी झाल्यामुळे बोर्डाने तात्काळ कार्यवाही करीत सावनेर तालुक्यातील मुलांना नागपूर येथील सेंटर चे हॉल तिकीट देण्यात आले.*
*या प्रकरणात महाराष्ट्र न्युज मीडिया तसेच इतर प्रसार माध्यमांनी प्रकरण उचलून धरले व चांगली प्रसिद्धी दिल्यामुळे मुलांना न्याय मिळाला असे मनोगत यांनी दिले मिळाल्यामुळे विद्यार्थी व पालक आनंदित होऊन श्री लोधी यांची भेट घेऊन आभार मानले तर अँड् अरविंद लोधी यांनी महाराष्ट्र न्युज मीडिया प्रबंधनाने सदर विषयास सोशल मीडियावर प्रखरतेने मांडून विद्यार्थ्यांन सह पालकांना मोठा दिलासा देण्यात मोलाचे सहकार्य केल्याचे मत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले*
Maharashtra News Media सच की आवाज