*गावातील गाजर गवत निर्मुलनासाठी बोडखा येथे अमोल ठाकरे व सहकाऱ्यांनी केली तननाशक फवारणी*

बुलढाणा प्रतिनिधि- नंदकिशोर शिरसोले

संग्रामपूर – तालुक्यातील बोडखा गावातील सार्वजनिक ठिकाणी वाढलेल्या गांजर गवतामुळे मच्छरांचे प्रमाण वाढल्याने डेंगू,मलेरिया सारखे रोग उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही,याची जाण ठेऊन पत्रकार अमोल ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी तननाशक फवारणी केली.

गावातील मराठी प्राथमिक शाळेतील परीसरात मोठ्या प्रमाणात गांजर गवत वाढलेले होते तसेच गावातील मुख्य पाण्याच्या टाकीजवळ व सार्वजनिक ठिकाणीसुध्दा गांजर गवत वाढलेले होते हि बाब पत्रकार अमोल ठाकरे यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतःव गावातील रोजगार सेवक वासुदेव गवई यांना सोबत घेऊन व गावातील सार्वजनिक ठिकाणी गांजर गवतावर तननाशकाची फवारणी केली.या सामाजिक कार्यामुळे अमोल ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांची वाहवाह होत आहे.

Maharashtra News Media सच की आवाज