Breaking News

*छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी*

*छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

नागपुर:- छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालय, सरस्वती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती संयुक्तरीत्या साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक सचिव डॉक्टर मारोती वाघ सर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या संचालिका प्राचार्या सौ .लता वाघ तसेच रामकृष्ण कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य पंकज झगडे सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली कार्यक्रमादरम्यान प्राध्यापक सुनिता नागपुरे व प्राध्यापक दीक्षा जनबादे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश टाकला .कार्यक्रमाला या संस्थेच्या संचालिका प्राचार्य सौ लता वाघ यांनी महात्मा गांधीजींच्या विचारातील अहिंसा व सत्य या तत्वांना पौराणिक इतिहासाची संस्कृती असल्याचे सांगितले त्याचबरोबर शिक्षकांनी या महान नेत्यांच्या विचारांना आत्मसात करावे असे देखील सांगितले प्राचार्य पंकज झगडे सर यांनी बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाला प्रत्येक प्राध्यापकाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थिनी पर्यंत पोहोचवावी व आधुनिक भूमिका स्विकारावी असे सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. मारुती वाघ सर यांनी या महान नेत्यांच्या जयंतीच्या मागील उद्देश लक्षात घेऊन प्रत्येक शिक्षकाने भविष्यातील सुदृढ पिढी तयार करण्याच्या कर्तुत्वाला आपली सामाजिक जबाबदारी समजावी असे सांगितले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक वनकर यांनी केले तर संचालन प्राध्यापक किशोरी भड व आभार प्राध्यापक विशाल कोठेकर यांनी व्यक्त केले .कार्यक्रम covid-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नियमानुसार पार पडला.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …