*ग्रामीण भागातील गुडगुडी झाली कालबाह्य* *आधुनिक प्लास्टिक वॉकरचा उपयोग*

*ग्रामीण भागातील गुडगुडी झाली कालबाह्य*


*आधुनिक प्लास्टिक वॉकरचा उपयोग*

विशेष प्रतिनिधि

मौदा/नागपुर – पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात लहान मुलाला चालणे शिकण्या करिता लाकडी गुगुडीचा उपयोग केला जात असे विशेष म्हणजे ही गुडगुडी गावातील सुतार तयार करीत असे लहान मूल एक वर्षाचे झाले की त्याला हमखास ती गुडगुडी दिली जायची आणि त्यापासून तो बाळ चालणे शिकायचा पण काळाच्या ओघात ती लाकडी गुडगुडी कालबाह्य झाली आणि त्या जागी प्लस्टिक चे वॉकर वापरले जाऊ लागले पाचशे ते दोन तीन हजार रुपये किंमत असलेले विविध प्रकारचे वॉकर आज बाजारात उपलब्ध आहेत अलीकडे तर सवयनचलीत वॉकर बाजारात उपलब्ध आहे .

आज ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अंतर्गत सिमेंट रस्ते तयार झाले असल्यामुळे गल्ली गल्लीत या वॉकर वर लहान मुलांना फिरवताना अनेक पालक दिसून येतात पूर्वीच्या काळी लहान मुलांची खेळणी म्हणजे घरातील टाकाऊ वस्तूचा संग्रह हीच त्यांची खेळणी किंवा लाकडापासून तयार केलेली खेळणी असायची पण आज मात्र या खेळनीची जागा पल्यस्टिक च्या अत्याधुनिक महागड्या खेळण्यांची घेतली कुठेतरी अंगणाच्या कोपऱ्यात दोनचार मुले एकत्र येऊन भातुकलीचा खेळ खेळताना मात्र दिसत नाही त्यामुळे आधुनिक काळात पल्यस्टिक ची विविध प्रकारची आकर्षक महागडी निर्जीव खेळणी हेच बालकांचे सवनगडी बनले असल्याचे।चित्र शहरप्रमाणे ग्रामीण भागात दिसून येत.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …