*होय…मी पुरुष आहे….*

*होय…मी पुरुष आहे….*

स्त्री विषयी अनेक लेखकांनी लिहिलंय…अनेक चित्रपट ही बनवले गेले…त्यातील समान धागा म्हटलं,
तर अबला,गरीब,असहाय्य,परावलंबी स्त्री आणि पुरुष म्हणजे दारुडा, तिचा छळ करणारा, अहं पणाने तिच्यावर अत्याचार करणारा,तिला वेठीस धरणारा,तिच्या अब्रू ची लक्तर वेशीवर टांगणारा…
नाही म्हणायला…समाजातील ५-१०% पुरुष असे असतीलही…
पण प्राणपणाने आपल्यातील खरा पुरुषार्थ जपणाऱ्या,एक आदर्श पिता,पती,मुलगा,भाऊ या पुरुषांमधील पैलुंबद्दल फार क्वचित लिहिलं, बोललं अथवा दाखवलं गेलंय….
अशीच पुरुषांची खंत व पुरुषांची कैफियत समाजासमोर मांडण्यासाठी,
अभिनय कट्टा कोराडी च्या
हौशी कलावंत मंडळींनी
‘हौशेला मोल नाही’
या म्हणीला सार्थ ठरवत,
लॉक डाऊन मुळे आतमध्ये असलेल्या कलाकाराला मंच देण्यासाठी कॅमेरा विश्वा कडे वळत,
शासनाने दिलेली नियमावली पाळत,
एक सुंदर असा लघु चित्रपट तयार केला आहे…
महानिर्मिती मधील ज्येष्ठ कलाकार श्री.शंकर शंखपाळे निर्मित,
श्री.संजय सातफळे यांच्या अभूतपूर्व शैलीत दिग्दर्शित झालेलं,
श्री.मिलिंद यादवराव चन्ने यांच्या संकल्पनेतून व काळजाला भिडणाऱ्या त्यांच्याच आवाजातून मूर्त स्वरूपात आलेल्या या लघु चित्रपटाला रसिक चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद व प्रेम दिलं आहे…
कोरोना मुळे नाट्य व सिने क्षेत्रावर मळभ दाटून आलेले असताना,
अभिनय कट्टा च्या कलाकार मंडळींनी पहिल्याच प्रयत्नात इतकी सुंदर कलाकृती निर्माण केली,याबद्दल संघाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
ते म्हणतात ना
प्रत्येक पुरुष हा ‘साहिर’ नसला
तरीही ‘इमरोझ’ होण्याचा
आणि आयुष्य प्रेमानं भारून टाकण्याचा
प्रयत्न जरूर करत सुख मिळो अथवा दुःख मिळो
सर्व परिस्थती मध्ये मी खूष आहे…*
**बाहेरून टणक,पण आतून मुलायम,
तुमच्या सर्वात असणारा,
होय मी एक पुरुष आहे…**

* आर्चिज डिजिटल हब * आणि अभिनय कट्टा
प्रथमच सादर करताय
शंकर शंखपाळे
निर्मित…
होय … मी पुरुष आहे
‌ दिग्दर्शन
संजय सातफळे
मूळ संकल्पना
लेखन
आणि
व्हॉइस ओव्हर
*मिलिंद यादवराव चन्ने*

* विशेष आभार *
प्रियंका कोतवाल , रचना जुनघरे

*कलाकार*
जयंत भातकुलकर
राणी बैलमारे
कावेरी रंधिये
संजय सातफळे
प्राची वरठे
सीमा शंखपाळे
अक्षय भोकरदनकर
साक्षी वरठे
शंकर शंखपाळे
इशा चौरसे
प्रदीप जांभुळकर
विभोर चौरसे
मिलिंद गवई
तृप्ती चन्ने
सारंग धुंदे
ओमप्रकाश मडावी
धनराज गावणेर
नाना घोंगे
विष्णू आडे.
गोपाळ राठोड

कॅमेरा
स्वास्तिक चौरसे

संगीत आणि संकलन
हर्ष बालपांडे

प्रोडक्शन
श्वेता नारनवरे
( अभिनय कट्टा , कोराडी )
स्वस्तिक चौरसे
( आर्चिज डिजिटल हब )

रंगभूषा वेशभूषा
अपेक्षा भातकुलकर ,
अश्विनी वाईकर ,
स्नेहल लोंढे
लाईट
सचिन डांगोरे ,
संदीप हिवरखेडकर

विशेष साहाय्य
वैशाली नंदरधने ,
अविनाश राऊत ,
उमेश पाटील ,
संजय चोपडे , (नेहा स्वीट सेंटर) ,
रमेश जानियानी (शर्मा मेडिकल)

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …