Breaking News

*वाघाने केली वासराची शिकार* *लोधा क्षेत्र येथील घटना*

*वाघाने केली वासराची शिकार*


*लोधा क्षेत्र येथील घटना*

देवलापार प्रतिनिधी-पुरुषोत्तम डडमल
देवलापार – रामटेक तालुक्यातील शेवटच्या टोकावरील लोधा येथील जंगलात काल दुपारी २:३० वाजताच्या सुमारास शेतकरी देवराव बोपटे हे आपल्या गायी व गुरे नेहमीप्रमाणे जंगलात चारण्यासाठी घेऊन गेले असता जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने जनावरांवर जोरदार हल्ला केला. 
अचानक घडलेल्या घटनेमुळे देवराव बोपटे पार घाबरून गेला होता.तसेच जीव वाचवण्यासाठी जनावरे ही इकडे-तिकडे सैरावैरा पळाली हीच संधी साधून अखेर, वाघाने एकट्यात गाठून वासरावर झडप घालून त्याला घटनास्थळीच ठार करून शिकार केली.
परिसरातील लोधा,करवाही,
सितापार,पिंडकापार, बेलदा ही गावे देवलापार वनपरिक्षेत्रात येतात. गेल्या काही वर्षांत वाघांसारख्या शिकारी प्राण्यांची संख्या या भागात कमालीची वाढली आहे. या क्षेत्रातील गावे जंगलांनी वेढलेली आहेत.अनेकांची शेती वनालगत असल्यामुळे शेतकयांचा जंगलाशी नेहमीच संबंध येतो. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परिसरात रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना नेहमीच वाघांचे दर्शन होत असतेे.यामुळेच वनविभागाने याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.  वाघांच्या हल्ल्यात मृत झालेल्या वासराची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देवराव बोपटे यांनी वनविभागाकडे केली आहे

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …