Breaking News

*धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा* *स्वत:च्याच घरात महामानवाला मानवंदना देउन साजरा करण्यात आला*

*धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा*

*स्वत:च्याच घरात महामानवाला मानवंदना देउन साजरा करण्यात आला*

नरखेड प्रतिनिधि तालुका श्रीकांत मालधुरे

काटोल – यावर्षी कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, भारतीय घटनेचेशिल्पकार महामानव भारतरत्न डाॅ. बाबासाहेब
आंबेडकर यांचा ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन जो दरवर्षी गावोगावी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत होता.

तो यावर्षी कोरोना महामारीच्या धास्तीने स्वत:च्याच घरात महामानवाला मानवंदना देउन साजरा करण्यात
येत असल्याची माहीती धम्म अनुयायांनी नुकतीच दीली. लाख कोटीच्या राजाला अभिवादन करण्यासाठी नागपूर येथील पवित्र
दिक्षाभुमीला दरवर्षी लाखो निळ्या पाखरांची
उपस्थीती असायची. गावोगावातुन लाखो धम्म
अनुयायी या दिवशी नागपूरला प्रस्थान करायचे, परंतु यावर्षी कोरोना महामारीच्यासावटाखाली संपुर्ण जग आले असुन धम्मचक्र
प्रवर्तन दिनाचा हा उत्सव आता घराघरातच
साजरा होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
मोठ्या शहरासह आता खेड्यापाड्यातही
कोरोनाने आपले हातपाय पसरायला सुरूवात
केली आहे. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा
हा सोहळा स्वत:च्याच घरात साजरा होणार
असल्याचे निदर्शनात येत आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …