Breaking News

*पशुवैद्यकीय रुग्णालयात मनविसेची धडक* *पशुपालकांची आर्थिक लूट न थांबल्यास तोडफोडीचा मनविसे जिल्हाउपाध्यक्ष प्रशांत जुंजारे यांचा इशारा*

*पशुवैद्यकीय रुग्णालयात मनविसेची धडक*

*पशुपालकांची आर्थिक लूट न थांबल्यास तोडफोडीचा मनविसे जिल्हाउपाध्यक्ष प्रशांत जुंजारे यांचा इशारा*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
वरोरा- कोरोनाच्या काळात देखील देशाला साथ देणाऱ्या शेतकऱ्यांचे मात्र हाल होत आहे .सर्व स्थरातून शेतकऱ्याची आर्थिक लूट होत आहे.शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करतात परंतु जेव्हा पशुधनावर वेगवेगळे रोग येतात तेव्हा मात्र त्यांना आर्थिक फटका बसतो. शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टरांना शेतकऱ्यांच्या घरी /बांधावर जाऊन उपचार करण्यासाठी बोलावले असता शासकिय पशुवैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टर शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहे .उपचाराच्या नावाखाली 200 ते 300 रुपये आकारले जात आहे.तसेच जनावरांची कृत्रिम गर्भधारणा साठी 300 रुपयांची फी आकारत आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी सुलतानी संकट असताना देखील शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरूच आहे.

सहायक आयुक्त पशुसंवर्धन तालुका /लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय वरोरा येथील डॉक्टर लोखंडे यांनी मनविसे तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी यांच्या घरी असलेल्या गायीच्या बछड्यावर उपचार करण्यासाठी 200 रुपये मागितले तसेच गायीची कृत्रिम गर्भधारणा करण्यासाठी 300 रुपये आकारले .या विरोधात शासकिय पशुवैद्यकीय रुग्णालय वरोरा येथील वरिष्ठ अधिकारी डॉ. जांभुळे यांच्याशी फोनवरून संवाद साधला असता जायला यायला पेट्रोल लागत असल्याने एवढी फी घेत असल्याचे सांगितले.
आज दिनांक 19 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत जुंजारे यांच्या नेतृत्वात मनविसे तालुका अध्यक्ष गौरव मेले ,मनविसे तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी ,मनसैनिक आकाश काकडे यांनी शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय वरोरा ला धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला असता शासकीय नियमानुसार ४१ रुपये फी शुल्क असल्याचे वरीष्ठ अधिकारी डॉ. जांभुळे यांनी सांगितले.तसेच यापुढे शासकीय पशुवैद्यकीय डॉक्टरांना कोणीही वाढीव फिस देऊ नये असे सांगितले.तसेच रुग्णालयात दार फलक नसल्याचे लक्षात येताच पुढील 5 दिवसात दरफलक लावून देण्याचे मान्य केले. पशुपालकांची होणारी आर्थिक लूट न थांबल्यास पशुवैद्यकीय रुग्णालयात तोडफोड करून रुग्णालयाचे कोणतेही कामकाज चालू देणार नाही असा धमकी वजा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत जुंजारे यांनी दिला.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …