*ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे जखमी बिबटच्या हालचालीवर लक्ष ठेवून शोध घेतला जात आहे*

*आज दुसऱ्या दिवशी सुद्धा जखमी बिबटचा शोध लागला नाही*

*२०ते२५वन कर्मचारी शोध मोहिमेत सहभागी*
देवलापार प्रतिनिधी -पुरुषोत्तम डडमल
देवलापार :-नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गवरून रस्ता ओलांडत असतांना काल दुपारी३ वाजताच्या दरम्यान वाहन क्रमांक एम एच -३६/एच-४८१४ ने बिबट्याला जोरदार धडक मारल्याने तो गंभीर जखमी झाला त्या बिबट्यावर वर उपचार करण्यासाठी वनविभाग सज्ज झाला असून कालपासूनच पवनी वनपरिक्षेत्रातील २० ते२५ अधिकारी व कर्मचारी रेस्क्यू टीम सोबत जखमी बिबट शोध मोहीम राबवित आहे.परंतू सूर्यास्तानंतर अंधार पडल्याने काल शोध मोहीम थांबविण्यात आली होती.ती आज पुन्हा २०ऑक्टोबर ला सकाळ पासून सुरू करण्यात आली दुपार पर्यंत जंगल पिंजून काढला.पण बिबट मात्र कोणाच्याही नजरेस पडला नाही.त्यामुळे जखमी बिबट्याच्या बारीक- सारीक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी शेत शिवरालगत असलेल्या कक्ष क्रमांक २७१च्या जंगल भागात ट्रॅप कॅमेऱ्याची मदत घेतली जात आहे.तसेच श्वान पथकाची ही या शोध मोहिमेत मदत घेतली जाण्याची शक्यता ही वन अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
बिबट जखमी अवस्थेत असल्याने तो अधिकच आक्रमक झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे बिबट हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे जंगला जवळील चोरखुमारी,डोंगरी, मुकणापुर,आदी गावात फिरून गावकर्यांना सतर्क राहण्याचे आवाहन पवनीचे वनपरिक्षेत्र अधिकार रितेश भोंगाडे यांनी केले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज