*संत्रा बागायतींवर, ब्राऊन रॅट(फळ-गळ)नंतर आता! डिंक्याचा मारा!*
*संत्रा उत्पादक हवालदिल*

*संत्राबागायतदारांना हेक्टरी५०,०००(पन्नास हजारांच्या अनुदानाची मागणी*
*संत्रा पीक वीमा किचकट*
कोंढाळी प्रतिनिधि – दुर्गाप्रसाद पांडे
कोंढाळी – एकि कडे ब्राऊन रॅट मुळे संत्रा बागायतदार फळ(सड) गळी च्या सपाट्यात सापडला असतांनाच, आता!संत्रा, मोसंबी व कागदी लिंबु च्या दर्जेदार उत्पादनातील सर्वांत महत्त्वाचा अडसर हा डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव आहे. हा रोग फायटोप्थोरा या बुरशीच्या प्रजातीमुळे उद्भवतो. ही बुरशी जमिनीत व रोगग्रस्त पिकांचे अवशेषांवर वर्षानुवर्षे वास्तव्य करून राहते. बागेत दीर्घ काळ भरपूर ओलावा टिकून राहिल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव व वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते. हवेतील अधिक सापेक्ष आर्द्रता यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार झपाट्याने होतो.
डिंक्यामुळे संत्रा, मोसंबी, किंवा लिंबाची झाडे कोलमडणतात, क्राऊन रॉट होतो, मूळसड होते, डिंक बाहेरवाहू लागतो, पाणगळ होते, फळसड (ब्राऊन रॉट) होते व शेंडेमर होऊन झाड वाळणे हा या प्रकारा मुळे संत्रा बागायतदार अडचीत सापडला आहे. या करीता राज्य सरकार ने संत्रा बागायतदाराना दिलासा म्हणून दर हेक्टरी पन्नास हजार रूपये मोबदला(अनुदान)द्यावे अशी मागणी काटोल तालुक्यातील मासोद येथील संत्रा उत्पादक शेतकरी प्रकाश बारंगे यांनी केली असुन कृषी विभागाने संतरा-मोसंबी-लिंबू बागायतदारानां वेळीच योग्य ते सद्याचे हवामान या वातवरणात बागायतींवर येणारे विविध रोगोंना रोखण्याचे उपायाकरिता कार्यशाळा घेऊन शेतकर्याचे बांधावर जाऊन योग्य मार्गदर्शन करावे अशी मागणी ही केली आहे.
*संत्रा पीक विमा किचकटीचा*
एकिकडे फळ गळ, डिंक्या, सारख्या आजाराने संत्रा बागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, यातच पीक वीमा कंपन्या चे अधिकार्यांची आडमुठे धोरण व कृषी अधिकारी किंवा कर्मचारी यांनी शेतकरी व पीक विमा कंपन्यांचे नियम समजून सांगील्या जात नाही, सोबतच संत्रा चे अंबीया व मृग बहार यांचे फळ धारना व पीक विमा यांचे नियम समजनेच कठिण असल्याचे संत्रा उत्पादक शेतकरी राष्ट्रपाल पाटील यांनी केली आहे. या बाबद काटोल उपविभागीय कृषी उपविभागीय अधिकारी विजय निमजे व तालुक्यातील कृषी अधिकारी सुरेश कन्नाके यांना विचारले असता सांगितले की की संत्रा उत्पादक शेतकरी राष्ट्रपाल पाटील यांची पीक नाण्याच्या अनियमिते बाबद तक्रार मिळाली आहे. या बाबद त्यांचे सोबत त्यांचे संत्रा बागे मधे पोहचून योग्य ते मार्गदर्शन करन्यात येईल
Maharashtra News Media सच की आवाज