Breaking News

*सेन्टेन्स हायस्कूल ची मनमानी फी न भरल्यास उत्तर पत्रिका मिळणार नहीं चा फतवा* *संतप्त पालक वर्ग आंदोलनाच्या भूमिकेत*

*सेन्टेन्स हायस्कूल ची मनमानी फी न भरल्यास उत्तर पत्रिका मिळणार नहीं चा फतवा*

 

*संतप्त पालक वर्ग आंदोलनाच्या भूमिकेत*

वरोरा प्रतिनिधि- जुबेर शेख

वरोरा – मागील कित्येक वर्षापासून वरोरा क्षेत्रात चर्चेचा विषय ठरलेली शाळा व्यवस्थापनाची मुजोरी अजूनही संपलेली नाही.

एकीकडे covid-19 प्रादुर्भावामुळे देशामध्ये आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. बेरोजगारीचा कहर सगळ्या देशभरात पसरलेला आहे. कोणतेही कॉलेज, तसेच विद्यामंदिरे अद्याप उघडलेले नाही. मात्र वरोरा शहरातील सेन्टेन्स हायस्कूल यांचा अजीब कारभारामुळे पालक वर्ग त्रस्त आहे.

सोमवारी सकाळी शाळेने सर्व पालक वर्गांना उत्तर पत्रिका घेऊन जाण्याच्या बहाण्याने बोलवण्यात आले. वरोरा येथील अधिकांश पालक शाळेमध्ये गोळा झाले यानंतर शाळा प्रशासनाने फतवाच काढला की जोपर्यंत दोन सत्राची लगभग 6000 रू फी भरणार नाही तोपर्यंत पालकांना उत्तरपत्रिका दिल्या जाणार नाही. अशी भूमिका घेतल्याने पालक वर्गात असंतोष निर्माण झाला.

या आधी ्सुद्धा पालक-शिक्षक समिती बैठकीत जोपर्यंत शाळा सुरू होणार नाही तोपर्यंत फी दिल्या जाणार नाही असा निर्णय झाला होता. आज शासनाने पाठविलेल्या परिपत्रकानुसार शाळा प्रशासनाला परीक्षा घेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. परंतु या सर्व बाबीला तिलांजली देत प्रशासनाची मुजोरी कायम आहे. याविरुद्ध पालक वर्गाने आंदोलन उभारले असून सर्व आंदोलनकर्त्यांनी आपल्या मुलाची टीसी काढण्याचा निर्णय घेतलेला आहे.

कोरोना काळात जीथे संपूर्ण जग एका ठिकाणी आर्थिक संकटात सापडला आहे तीथेच शिक्षण खात्यातील या शिक्षण सम्राटांच्या या मुजोरी च्या विरोधात अनेक तक्रारी होऊन सुद्धा आतापर्यंत संबंधित संस्थेवर कोणत्याही प्रकारची कारवाई का करण्यात आलेली नाही.असा यक्ष प्रश्न पालक वर्गातुन होत असुन संस्थाचालक व शिक्षण खात्यामध्ये मिलीभगत असलेल्या मुळे पालक आणि विद्यार्थी भरडल्या जात आहे. जिल्हाधिकारी आणि राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू याकडे लक्ष घालावे अशी पालकांची मागणी आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …