*भव्य शेतकरी, वीज व विदर्भ मेळावा*

 

*भव्य शेतकरी, वीज व विदर्भ मेळावा*

उपसंपादक- दिलीप घोरमारे (सावनेर)

सावनेर *नागपूर जिल्हा शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समिती व्दारे दी 13सप्टेंबर2019 रोज शुक्रवारला भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन जनता सेलिब्रेशन हाँल केळवद रोड सावनेर येथे करण्यात आले असुन सदर मेळाव्यास शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा अध्यक्ष अरुण केदार व वरिष्ठ मान्यवर पदाधिकारी मंडळी मार्गदर्शन करणार आहे.*
*सदर मेळाव्याच्या माध्यमातून शेतकर्यांची संपूर्ण कर्ज मुक्ती झालीच पाहिजे,शेतकर्यांच्या शेतमालाला रास्त भाव देवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हणण्यानुसार पन्नास टक्के मुनाफा भाव देण्यात यावा,शेतकरी व शेतमजूरांना पेंशन मीळाली पाहिजे, शेतकर्यांचे कु्षी पंपाची लोडशेंडीग बंद झाली पाहिजे, ग्रामीण भागातील लोडशेडींग संपवून उच्च दाबाची वीज मीळाली पाहिजे, दिल्लीप्रमाणे विजेचे दर निम्मे झाले पाहिजे तसेच ग्रामीण भागातील सर्व सुशिक्षित अशिक्षित बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे अश्या विविध मागण्या करीता आंदोलनात्म रुपरेषा तयार केल्या जाणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्राकातुन देण्यात आली आहे.*
*सदर मेळाव्यास दिलीप घोरमारे(जिल्हाध्यक्ष युवा आघाडी शेतकरी संघटना),विनायक खोरगडे (तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना),सुनील वडस्कर (जिल्हा उपाध्यक्ष वि.रा.आ.स.,रवी हटकर तालुका अध्यक्ष वि.रा.आ.स.,नंदु बेगड तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना कळमेश्वर,अरुण भोसले जील्हा उपाध्यक्ष शेतकरी संघटना,ऋषभ वानखेडे,नंदु ठाकुर,संजय टेंभेकर,शेषराव आठवणे,रविना श्यामकुळे,मुकेश मासुरकर,प्रविन डांगे,वीजय मौदकर ईत्यादी प्रमुख रुपाने उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत तरी तालुक्यातील सर्व शेतकरी,शेतमजूर,सुशिक्षित अशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी जास्तीत जास्त संखेने उपस्थित राहुन मेळाव्याचा लाभ ध्यावा अशी विनंती दिलीप घोरमारे जिल्हाध्यक्ष युवा आघाडी शेतकरी संघटना यांनी केली आहे.*

Check Also

*आई.एम.ए डॉक्टरों का एक दिवसीय प्रतीकात्मक आंदोलन* *उन हत्यारों को तुरंत फाँसी दो।*

🔊 Listen to this *आई.एम.ए डॉक्टरों का एक दिवसीय प्रतीकात्मक आंदोलन* *उन हत्यारों को तुरंत …