*अल्ट्राटेक सिमेंट च्या वतीने गुणवंत विध्यार्थांचा सत्कार*
कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे
कोरपना :- अल्ट्राटेक सिमेंट व्दारे अल्ट्राटेक कम्यनिटी वेलफेअर फाऊंडेशन यांच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही दहावी व बारावी मध्ये माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देऊन नुकताच सत्कार करण्यात आला . कोविड – 19 चा संसर्ग लक्षात घेता या 6 विध्यार्थांचा सत्कार केला व उर्वरीत विध्यार्थांना त्यांच्या शाळेमध्ये शाळेच्या प्राचार्या व्दारे सत्कार करण्यात येईल सत्कारामध्ये साहील किशोर खनके, श्री शिवाजी इंग्रजी हायस्कूल नांदा, पुजा गुलाब ताजने, माहात्मा गांधी विद्यालय, गडचांदुर,रामेश्वरी किर्तन साहु, श्री प्रभु रामचंद्र विद्यालय, नांदा, मनीषा गणेश गायकवाड, प्रिय दर्शनी विद्यालय, नांदा, संकुती मिलिंद खाडे, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, आवारपूर, सुहानी आनंद टोंगे श्री प्रभु रामचंद्र विद्यालय, नांदा, इत्यादींचा सत्कार मा. विजय एकरे, युनिट हेड यांनी केला. यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये विध्यार्थांच्या उज्वल भविष्याप्रती धन्यवाद दिले तसेच त्यांच्या पुढील शिक्षणामध्ये अधिक प्रविण्य मिळण्याकरिता शुभेच्छा दिल्या.
मा. विजय एकरे साहेब, युनिट हेड, मा.अनिल पिल्लई साहेब, फक्शन हेड, मा. बी. पी. सग्गु साहेब, फक्शन हेड हे प्रामुख्याने उपस्थित होते. अल्ट्राटेक कम्यनिटी वेलफेअर फाऊंडेशन च्या परिसरातील आवारपूर, नांदा, गडचांदुर व बाखर्डी येथील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा या वेळेला सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे संचालन तथा प्रास्ताविक संजय पेटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन गोवारदीपे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीतेकरीता संजय ठाकरे व देविदास मांदाळे व इतर समस्त कर्मचारी उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज