Breaking News

*” माझे कुटूंब माझी जबाबदारी ” अंतर्गत राहूल जिभकाटे यांना राज्यस्तरीय पूरस्कार*

*” माझे कुटूंब माझी जबाबदारी ” अंतर्गत राहूल जिभकाटे यांना राज्यस्तरीय पूरस्कार*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

नागपुर:- तायवाडे महाविद्‍यालय महादुला-कोराडी येथील राष्ट्रीय सेवा आयोजनेचा स्वय:सेवक राहूल जिभकाटे ( बी.एससी. भाग ३चा विद्यार्थी यांना “माझे कुटूंब माझी जबाबदारी ” या अभियानाअंतर्गत डॉ.किशोर घोरमाडे ( रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी )तायवाडे महाविद्यालय महादुला-कोराडी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे त्याची निवड करण्यात आली.त्यानिमित्ताने महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शरयु तायवाडे यांनी पुष्पगूच्छ देवून राहुलचे अभिनंदन केले.

या अभियानांअतर्गत श्री.राहूल यांनी दि.२३/१०/२०२० ते २५/१०/२०२० या अल्पकालावधित २५० घरांना गृहभेट देवून सर्वेक्षण केले.तसेच “माझे कुटूंब माझी जबाबदारी “चे १०००स्टीकर लावले.सर्वेक्षण केलेल्या घरांची नोदंणी महानगर पालिकेत केली.राहुलला महानगरपालिकेतर्फे सुध्दा मा.महापौर सदिंपजी जोशी यांनी प्रशस्तीपत्र देवून त्याचे अभिनंदन केले.राहुल जिभकाटे हा महाविद्‍यालयाचा उत्कृष्ट विद्यार्थी असुन नेहमी सामाजिक कार्यात तो अग्रसर असतो.नुकतेच त्याने एका थॕलेसेमिया पेशंटला स्वत: व इतर पाच मित्रांना सोबत घेवून सहा बाटली रक्तदान केले आहे.त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत प्राचार्य डॉ.शरयु तायवाडे यांनी राहुलचे अभिनंदन केले.यावेळी डॉ.किशोर घोरमाडे राष्‍ट्रीय सेवा योजना अधिकारी ,तायवाडे महाविद्यालय महादुला-कोराडी, डॉ .वर्षा वैद्य,डॉ.वकील शेख, डॉ.प्रेरणा थोरात,कु.शुभांगी व-हाडे इतर प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …