*देवलापार पोलिसांच्या सायकल पेट्रोलींग पथकाची कट्टा येथे मोहफुल हातभटटीवर धाड*
*दोन आरोपीसह ३१हजाराचा मुद्देमाल जप्त*
देवलापार प्रतिनिधी- पुरुषोत्तम डडमल
देवलापार – पोलीस स्टेशन देवलापार येथील ठाणेदार प्रविण बोरकूटे यांच्या संकल्पनेतुन सायकल पथक तयार केले असून त्यामध्ये ठाणेदार प्रवीण बोरकुटे,पोउपनि केशव पूंजरवाड, गजानन जाधव, रमेश खरकटे,सचिन डायलकर असे असून सदर पथक रोज सकाळी २५ ते ३० किलोमिटर अंतर पेट्रोलींग करत असून ते पेट्रोलींग दरम्यान रोज पाच ते सहा गावाला भेट देतात त्या भेटी दरम्यान गावातील अडीअडचणी व गुन्हेगार याची माहिती घेत असतात व तसेच प्रत्येक गावाला भेट दिली जाते.
रोजच्या प्रमाणे आज २८ऑक्टोबर ला सकाळी ७ वाजताच्या दरम्यान पोलीस सायकल पेट्रोलींग करीत आसताना.पोलिसांना खबरीलालद्वारे माहिती मिळाली की,कट्टा शिवारात नाल्याच्या काठावर काहि इसम मोहफुल हातभटटी लावून दारू गाळत आहेत.
अशा खबरेवरून सदर सायकल पथक घटनास्थळी जावून जंगल परीसरात शोध घेतला आसता तेथील नाल्यावर दोन इसम मोहफुल हातभटटी लावून दारू गाळतांना पोलिसांना दिसून आले तेव्हा लपत छपत जावून सदर इसमाना घटनास्थळी पकडून त्याचे नाव व गाव पोलिसांनी विचारले आसता १)अशोक रामनाथ वरठी २)राजेश प्रकास खंडाते दोन्ही राहणार कट्टा असे सांगितल्यावर सदर पथकाने परिसराची झडती घेतली असता.घटनास्थळावरून ५० लीटर मोहफुल दारू व २००किलो मोहफुल सडवा असा एकुण ३१ हजार रुपये चा मुददेमाल मिळुन आल्यावर पोलिसांनी आरोपीना ताब्यात घेवून त्यांच्यावर दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली.
सदर गुन्हयाचा तपास ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि केशव पूंजरवाड करीत आहे .