*विद्युत मंडळ व कर्मचारी यांच्या निष्काळजी पणा मुळे भायवाडी डीपी मुळे शेतकऱ्यांच्या जीवाला मोठा धोका*
*जीव मुठीत घेऊन करतात लाईन दुरुस्ती*
बेलोना प्रतिनिधी – चंद्रशेखर मस्के
नरखेड – तहसील मधील भायावडी शिवारातील हिरूडकर डीपी न 2 ही शेतकऱ्यांच्या जीव घेणारी ठरत असून येथे कधी केव्हा कोणाचं जीव जाईल हे सांगता येत नाही .या डीपिवर अंदाजे 25/30 मोटार पंप असून इथे मोठ्याप्रमाणात फ्यूज जात असतात त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.या डिपिवर मेन स्विच नाही आणि डिओ जर पडला तर तो डिओ लागत नाही त्यामुळे या डीपिवर फ्यूज टाकण्यासाठी शेतकरी भित असतात. सर्वांना आपला जीव प्रिय आल्यामुळे कोण इथे आपला जीव गमावेल या भीती मुळे शेतकरी फ्यूज टाकत नाही तर काही शेतकरी महाराष्ट्र विद्युत मंडळातली कर्मचारी यांना फोन लावून कंप्लेंट सांगत असतात तर काही शेतकरी प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन कम्पलेट करतात साहेब आम्हाला डीपिवरती मेन स्विच लाऊन (येमसिबी) आम्हाला ग्रिप द्या. फुज तार द्या आणि आमची डीपी दुरुस्त करून द्या आणि आम्हाला जेव्हा लाईन प्रोब्लेम होतो तेव्हा लाईंमेन कर्मचारी पण पाठवत जा .तर याकडे विद्युत मंडळ कर्मचारी दुर्लक्ष करतात तसेच कंप्लेंट वर टाळा टाळ करतात . शेतकऱ्यांना आपल्या पिकाला पाणी देण्यासाठी स्वतःच डीपीवर जावे लागत आहे जर यामध्ये कुठल्या शेतकऱ्यांचा जीव गेला तर याला जीमेदार विद्युत मंडळ कर्मचारी राहतील तसेच शेतकऱ्यांना मोटार पंपला पाणी देण्यासाठी विद्युत वितरण मंडळाने टाईम टेबल दिला आहेत त्यात पण लाईन तुटवडा भरपूर प्रमाणात होत असतो आणि त्यात फ्यूज जाण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकरी बांधवांना भयंकर त्रास सहन करावा लागतो जर आज काही प्रोब्लेम झालं तर तो आज दुरुस्त होत नाही तर दुसऱ्या दिवशी तो दुरुस्त होईल का हीच चिंता शेतकऱ्यांना असते त्यामुळे शेतकरी विद्युत मंडळ वितरणावर तसेच कर्मचारी वर्गावर मोठी नाराजी व्यक्त करत आहे.