Breaking News

*कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा वर्धापन दिन थोडक्यात साजरा* *कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टिंग, मास्क, सँनिटायझर चा वापर करून ४६ वा वर्धापन दिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला*

*कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा वर्धापन दिन थोडक्यात साजरा*


*कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टिंग, मास्क, सँनिटायझर चा वापर करून ४६ वा वर्धापन दिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

कोराडी- दरवर्षी मोठ्या उत्साहाने, आनंदाने साजरा होणारा कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा वर्धापन दिन यंदा साध्या पध्दतीचे आयोजन करण्यात आले होते. झपाट्याने वाढत असणारा कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता यंदाच्या वर्धापन दिन थोडक्यात साजरा करण्यात आला सकाळी आठ वाजता युनिट क्रमांक पाच औष्णिक विद्युत केंद्र, 210 मेगावॅट येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य अभियंता राजकुमार व औष्णिक विद्युत केंद्र, 660X3 मेगावॅट चे मुख्य अभियंता राजेश पाटील तसेच प्रोजेक्टचे मुख्य अभियंता अनिल आष्टणकर, तसेच अभियंते, कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला. कोरोणाच्या काळात कुठेही वीज अखंडित न होता अहोरात्र मेहनत करणारे अनेक विभागातील कोराणा योद्धा यांच्या शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
दहा दिवस चालणारा कार्यक्रम वेबिनारव्दारे पार पाडला. विविध त‌‌ज्ञयांनी कोविड-19 च्या काळात कोरोणावर कशी मात करता येईल यावर उत्कृष्ट मार्गदर्शन वेबिनार व्दारा करण्यात आले. कार्यक्रमस्थळी कोरोना पासून बचाव करण्याकरिता अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या अनेक अभियंते यांनी कामगारांना मार्गदर्शन केले.


उपमुख्य अभियंता सुनिल सोनपेठकर, उपमुख्य अभियंता संजय रहाटे तसेच अधीक्षक अभियंता के एल माटे, विजय चौधरी, विलास मोटघरे, अशोक भगत, महेंद्र जीवने, शिरिष वाठ, प्रकाश प्रभावत, उपमहाव्यवस्थापक, पुरुषोत्तम वारजूरकर उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, प्रसाद निकम कल्याण अधिकारी, प्रविण बुटे उप कार्यकारी अधिकारी, दिलीप वंजारी सह कल्याण अधिकारी, प्रकाश वांढरे आदी अधिकारी, कर्मचारी, कामगार, तंत्रज्ञ, संघटना पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.

मुख्य अभियंता राजेश पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपण कोरोणा महामारी सारख्या रोगाशी आपण आपल्या जीवाची पर्वा न करता आपण आपली जनसेवा सुरळीत पार पाडली व आपले कर्तव्य पार पाडले हे कौतुकास्पद आहे असे पाटील बोलत होते.

210 मेगावॅट मधील मुख्य अभियंता राजकुमार तासकर यांनी मार्गदर्शन करतांनी मनाले कि, अभियंते, कर्मचारी, कंत्राटी कामगारांचे मनोबल वाढवीत आपण कोरोणाच्या काळात केलेली उत्तम कामगिरी विज अखंडीत न पडता आपण व्यवस्थित पणाने प्लांट सुरू ठेवला आपण सर्वच कर्मचाऱ्यांनी उत्तम काम करून जर वीज नसती तर अनेक समस्या उद्भवलेल्या असत्या आपण केलेले उत्तम कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहेत.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …