*प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीना धक्काबुक्की करणाऱ्या AGIPL च्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार कधी?*
*20 दिवसापासून पोलीस कारवाई करीत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*
वरोरा प्रतिनिधि – मुजम्मिल शेख
वरोरा – तालुक्यातील AGIPL शेंबळ या कंपनीला राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे स्थानिकांना रोजगार द्या या मागणीसाठी वारंवार निवेदन देऊनही प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे 29/10 /2020 रोजी सकाळी 8 वाजता मुज्जमिल शेख जिल्हा महासचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या मार्गदर्शनाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले .या ठिय्या आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी रवी रंगारी गेले असता त्यांना AGIPL चे प्रोजेक्ट मॅनेजर राजेश शर्मा यांनी धक्काबुक्की करीत त्यांचं ओळखपत्र व मोबाइल हिसकावून घेतला त्यात बाचाबाची झाली, त्यामुळे दिनांक 29/10/2020 रोजी 11 वाजता इतर पत्रकारासह पोलीस स्टेशन वरोरा येथे लेखी तक्रार देण्यात आली होती.या लेखी तक्रारींवर दिवसभर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. अखेर त्याच दिवशी सायंकाळी ठाणेदार उमेश पाटील यांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस अधिकारी किटे यांच्याकडे प्रकरण देण्यात आले, त्यानुसार तपास अधिकारी किटे यांनी पत्रकार रवी रंगारी व घटनास्थळी हजर असलेले पत्रकार जुबेर शेख ,व आंदोलक मुज्जमिल शेख यांचे बयान नोंदविले. परंतु त्यानंतर 20 दिवसांपर्यंत त्या कंपनी च्या अधिकाऱ्यांवर कोणतीही चौकशी होऊन कारवाई झालेली नाही.
त्या अनुशंगाने दिनांक 19/11/2020 ला तपास अधिकारी किटे यांची भेट घेऊन कारवाई का झाली अशी विचारणा केली असता त्यांनी कारवाई संबंधित कोणतेही साकारात्मक उत्तर दिले नसल्याने तसेच फक्त पत्रकाराला धक्काबुक्की करणाऱ्या त्या कंपनी ला सीसीटीव्ही फुटेज साठी मागणी केल्याचे सांगितले .या कंपनीने सीसीटीव्ही फुटेज अजून दिलेले नाही .या प्रकरणात 20 दिवसापासून रेंघळत आहे सदर प्रकरणात चौकशी अधिकारी नेमके काय करीत होते ? हा चर्चेचा विषय ठरत आहे.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर ओढावलेल्या अश्या कटु प्रसंगाच्या तपासात जर स्थानिक पोलीस प्रशासन याप्रकारच्या दिरंगाई करत असतील तर जनसामान्यांच्या प्रकरणाचे काय होत असेल.स्थानिक पोलिसांकडून सदर प्रकरणात वेळीच तपास करुण न्याय न मिळाल्यास स्थानिक सर्व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मा.पोलीस आधिक्षक यांच्याकडे न्याय मागण्यांसाठी जाण्याच्या तयारीला लागले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज