Breaking News

*मालती श्रीखंडे यांना आचार्य (पी.एच.डी.) ही पदवी*

*मालती श्रीखंडे यांना आचार्य (पी.एच.डी.) ही पदवी*

रामटेक प्रतिनिधि-  ललित कनोजे 

नागपुर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,नागपूर ने आज दिनांक १२ नोव्हेंबर २०२० रोजी कला विभागातील मराठी या विषयात सौ.मालती श्रीखंडे यांना आचार्य (पी.एच.डी.) ही पदवी प्रदान केली.

त्यांचा संशोधनाचा विषय संत नामदेव आणि संत कबीर यांचा भक्तिविचार….एक विवेचनात्मक अभ्यास….हा होता.

संशोधन कार्य करतांना त्यांना गुरुतुल्य डॉ गुरुप्रसाद पाखमोडे , सेवानिवृत्त प्राचार्य,महिला महाविद्यालय,भंडारा यांचे मार्गदर्शन लाभले….

आपल्या या यशात त्यांनी प्रामुख्याने पती डॉ अविनाश श्रीखंडे व मुलगा चि तन्मय यांचा सिंहाचा वाटा होता याशिवाय मित्रमंडळी,माहेरचे तसेच सासरचे सर्व नातेवाईक यांनी मोलाचे सहकार्य केले,असे त्यांनी आपले मत व्यक्त केले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …